शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
4
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
5
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
6
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
7
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
8
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
9
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
10
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
11
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
12
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
13
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
17
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
18
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
20
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!

साडेचारशे भाविकांनी धरली पंढरीची वाट, १०० बसेसचे नियोजन

By जितेंद्र दखने | Updated: June 24, 2023 16:52 IST

दोन दिवसांत १० लालपऱ्या लागल्या धावू

अमरावती : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे भरणाऱ्या यात्रेसाठी राज्य एसटी महामंडळाने विभागातील ८ आगारांतून १०० बसेस सोडण्याची नियोजन केले आहे. यानुसार गुरुवार आणि शनिवार अशा दोन दिवसांत १० एसटी बसेस पंढरपूरसाठी रवाना झाल्या आहेत. या बसेसद्वारे जिल्हाभरातील ४५० वारकऱ्यांनी पंढरीची वाट धरली आहे.

यंदादेखील आषाढीवारीच्या निमित्ताने जिल्ह्यातील लाखो भाविक पंढरपुरात विठुरायाच्या दर्शनासाठी निघाले आहेत. जिल्ह्यातून एकादशीला भाविक दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची मोठी प्रमाणात असते. या भाविकांना प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ज्यादा वाहतूक नियोजन करण्यात आले आहे.

विभागातील अमरावती, बडनेरा, परतवाडा, दर्यापूर, चांदूर बाजार, मोर्शी, वरूड,आणि चांदूर रेल्वे अशा आठ आगारामधून १०० एसटी बसेसचे नियोजन विभाग नियंत्रक नीलेश बेलसरे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले आहे. त्यानुसार एकादशीसाठी पंढरपूरला गुरुवारी ४ बसेस आणि शुक्रवारी ६ अशा १० बसेस सोडण्यात आल्या आहेत. यामध्ये १२० अमृत ज्येष्ठ नागरिक,१८६ महिला आणि १४६ इतर वारकरी असे एकूण ४५२ भक्त पांडुरंगाचे भेटीला आषाढी एकादशीनिमित्त रवाना झाले आहेत.

महामंडळाने २१ ते २९ जूनपर्यंत वारकऱ्यांना पंढरपूर जाण्यासाठी बसेस आहेत. तर परतीच्या प्रवासाकरिता २९ जून ते ४ जुलैपर्यंत लालपरीची प्रवाशांसाठी सुविधा एसटी महामंडळाने उपलब्ध करून दिली आहे. अमरावती विभागातील एसटी बसेसकरिता पंढरपूर येथे भीमा बसस्थानकावर नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ आदी ठिकाणांहून येणाऱ्या व जाणाऱ्या बसेस प्रवाशांची ने-आण करणार आहेत.

महिला, ज्येष्ठ नागरिकांची एसटीला पसंती

आषाढीवारीच्या निमित्ताने ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात येत असतात. पण रेल्वे प्रशासनाकडून ज्येष्ठ नागरिकांच्या तिकीट दरातील सुविधा बंद केली आहे. दुसरीकडे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून राज्यभरातून एसटीतून प्रवास करणाऱ्या महिलांना तिकिटामध्ये ५० टक्के सरसकट सवलत दिली आहे. तसेच ७५ वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिकांना एसटीने मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिली करून दिली आहे. याशिवाय ६५ वर्षांपुढील नागरिकांना अर्धे तिकीट प्रवास भाडे आकारले जाते. यामुळे वारीतील ज्येष्ठ नागरिक एसटीला प्रथम पसंती दर्शवताना दिसून येत आहे.

टॅग्स :state transportएसटीroad transportरस्ते वाहतूकPandharpurपंढरपूर