शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या मातोश्रींना अमरावती विद्यापीठाचे डी.लिट.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 17:29 IST

Amravati : बिहार, सिक्कीम व केरळचे माजी राज्यपाल तथा रिपाइंचे ज्येष्ठ नेते दिवंगत रा. सू. उपाख्य दादासाहेब गवई यांच्या सुविद्य पत्नी डॉ. कमलताई गवई यांनी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातून राज्यशास्त्र विषयात संशोधनात्मक डी.लिट सर्वाेच्च पदवी मिळविली आहे.

अमरावती : बिहार, सिक्कीम व केरळचे माजी राज्यपाल तथा रिपाइंचे ज्येष्ठ नेते दिवंगत रा. सू. उपाख्य दादासाहेब गवई यांच्या सुविद्य पत्नी डॉ. कमलताई गवई यांनी संत गाडगे बाबा अमरावतीविद्यापीठातून राज्यशास्त्र विषयात संशोधनात्मक डी.लिट सर्वाेच्च पदवी मिळविली आहे, अशी माहिती कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते यांनी शनिवारी पत्रपरिषदेतून दिली.

कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते यांच्या माहितीनुसार सोमवार, दि. २३ फेब्रुवारी रोजी अमरावती विद्यापीठाच्या ४२व्या दीक्षान्त समारंभात डॉ. कमलताई गवई यांना मानवविज्ञान विद्याशाखेतंर्गत राज्यशास्त्र विषयात वाङ्मय पंडित (डी.लिट) या सर्वोच्च पदवीने सन्मानित करण्यात येणार आहे. माजी भारतीय सेनाप्रमुख जनरल मनोज पांडे यांच्या हस्ते ही पदवी सन्मानित केली जाणार आहे. डॉ. कमलताई गवई या देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती भूषण गवई यांची मातोश्री आहेत. अमरावती विद्यापीठातून यापूर्वी डॉ. किशाेर अढाव, डॉ. संतोष ठाकरे आणि आता माजी लेडी गर्व्हनर डॉ. कमलताई गवई यांनी संशोधनात्मक डी.लिट मिळविण्याचा बहुमान मिळाला आहे. तसेच यापूर्वी ज्येष्ठ गायिका आशा भोसले, पद्यश्री शंकरबाबा पापळकर यांना अमरावती विद्यापीठाने मानद डी.लिटने सन्मानित केले आहे.

डॉ. कमलताई यांचे विपश्यना, सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान

अमरावतीनजीकच्या मोगरा येथे डॉ. कमलताई गवई यांच्या अथक परिश्रमातून विपश्यना केंद्र साकारण्यात आले आहे. या केंद्राच्या माध्यमातून विशेष विपश्यना शिबिर, ध्यानसाधना निरंतरपणे सुरू आहे. डॉ. कमलताई या वृक्षप्रेमी असून, त्यांनी या विपश्यना केंद्राचापरिसर हिरवळमय केला आहे. मुलाबाळांप्रमाणे त्या झाडाची निगा राखतात. म्हणून हे विपश्यना केंद्र विविध झाडे, वृक्ष आणि फुलझाडांची नटलेला दिसून येतो. तसेच या ठिकाणी सामाजिक कार्य सतत सुरू असते. डॉ. कमलताई गवई यांनी अमरावतीच्या तक्षशीला महाविद्यालयाचे प्राचार्यपद समर्थपणे हाताळले आहे. सामाजिक, पर्यावरण आणि शिक्षण क्षेत्रात त्यांचे अतुलनीय कार्य आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Justice Bhushan Gavai's mother, Kamaltai Gavai, awarded D.Litt by Amravati University.

Web Summary : Kamaltai Gavai, mother of Justice Bhushan Gavai, will be honored with a D.Litt. by Amravati University for her research in political science. The award recognizes her social and educational contributions, including establishing a Vipassana center. General Manoj Pande will present the award.
टॅग्स :Amravatiअमरावतीuniversityविद्यापीठEducationशिक्षण