माजी राष्ट्रपतींचा चार दिवस मुक्काम
By Admin | Updated: February 7, 2015 23:16 IST2015-02-07T23:16:50+5:302015-02-07T23:16:50+5:30
माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील या चार दिवस अमरावतीच्या दौऱ्यावर आहेत. त्या खासगी कामानिमित्त आल्या आहेत. ११ फेब्रुवारीपर्यंत त्यांचा मुक्काम राहणार आहे. काँग्रेसनगर स्थित देवीसदन

माजी राष्ट्रपतींचा चार दिवस मुक्काम
अमरावती : माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील या चार दिवस अमरावतीच्या दौऱ्यावर आहेत. त्या खासगी कामानिमित्त आल्या आहेत. ११ फेब्रुवारीपर्यंत त्यांचा मुक्काम राहणार आहे. काँग्रेसनगर स्थित देवीसदन येथे त्यांच्या निवासस्थानी मुक्कामी राहणार आहेत.
प्रतिभातार्इंचे शनिवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास येथील शासकीय विश्रामभवनात नागपूर येथून आगमन झाले. यावेळी विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, जिल्हाधिकारी किरण गित्ते, पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांनी त्यांचे पुप्षगुच्छ देऊन स्वागत केले. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील या एम.एच.३१, डी.आय-९ या क्रमांकाच्या वाहनातून दाखल झाल्यात.