माजी नगराध्यक्ष रफीक सेठ यांना अटक
By Admin | Updated: April 3, 2016 03:49 IST2016-04-03T03:49:19+5:302016-04-03T03:49:19+5:30
व्हॉट्स अॅप ग्रुपवर हिंदू देवी-देवतांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी अचलपूर नगर पालिकेचे माजी नगराध्यक्ष हाजी मो. रफीक सेठ यांना...

माजी नगराध्यक्ष रफीक सेठ यांना अटक
नागरिकांमध्ये रोष : हिंंदू देवीदेवतांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट
परतवाडा : व्हॉट्स अॅप ग्रुपवर हिंदू देवी-देवतांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी अचलपूर नगर पालिकेचे माजी नगराध्यक्ष हाजी मो. रफीक सेठ यांना शनिवारी सकाळी १० वाजता परतवाडा पोलिसांनी अटक केल्याने येथील राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे.
रफीक सेठ यांना शनिवारी सकाळी अटक केल्यानंतर दुपारी अचलपूर न्यायालयात हजर केले असता जामीन मंजूर करण्यात आला. गुरुवारी मध्यरात्री १२ वाजता व्हॉट्स अॅपवर आक्षेपार्ह व अश्लील मॅसेज टाकला होता. याविरुध्द ग्रुप अॅडमिन नरेश तायवाडे यांनी परतवाडा पोलिसात शुक्रवारी तक्रार दाखल केली होती. त्यावरून परतवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली होती. शनिवारी दुपारी रफीक सेठ यांना अचलपूर येथील प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी क्रमांक १ चे न्यायाधीश कुळकर्णी यांच्या न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज मंजूर केला. माजी नगराध्यक्ष राहिलेले रफीक सेठ हे सतत या-ना त्या कारणाने वादग्रस्त ठरले आहेत. रफीक सेठ हे लोकशाही या ग्रृपचे सदस्य आहेत. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास त्यांनी हिंदू देवी-देवतांसंदर्भात ग्रुपमधून १५ प्रश्न इतरत्र शेअर करण्याची विनंती केली. व्हॉट्सअॅपवर टाकलेल्या या आक्षेपार्ह पोस्टरवर जुळ्या शहरात उलट-सुलट चर्चा सुरू होती.