माजी जिल्हा परिषद सदस्याच्या मुलास अटक
By Admin | Updated: July 9, 2016 23:58 IST2016-07-09T23:58:08+5:302016-07-09T23:58:08+5:30
येथील एका गर्भश्रीमंत परिवारातील अल्पवयीन मुलीची छेड काढून मोबाईल क्रमांक मागितल्याच्या तक्रारीवरून...

माजी जिल्हा परिषद सदस्याच्या मुलास अटक
परतवाडा : येथील एका गर्भश्रीमंत परिवारातील अल्पवयीन मुलीची छेड काढून मोबाईल क्रमांक मागितल्याच्या तक्रारीवरून माजी जिल्हा परिषद सदस्य तथा कंत्राटदाराच्या मुलाविरुद्ध शुक्रवारी रात्री परतवाडा पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करून अटक केली.
अनिरुद्ध अरुण अकोटकर (१८,रा. गोपालनगर, परतवाडा) असे आरोपीचे नाव आहे. मुलीच्या तक्रारीनुसार सदर युवक आपल्या चार चाकी वाहन घेऊन आला होता.
अल्पवयीन मुलीची तक्रार
परतवाडा : क्रमांक एमएच २७ टी ०३३३ या चारचाकी वाहनाने शुक्रवारी सायंकाळी ४ वाजतादरम्यान मुलीच्या घरापुढे आला. मुलीला खाली बोलावून मोबाईल क्रमांक मागितला व मुलीचा सतत पाठलाग केला. पोलिसांनी अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून अनिरुद्ध अकोटकर विरुद्ध विनयभंग व बालसंरक्षण कायदा डी १२, पास्को दाखल केला. शुक्रवारी रात्री त्याला अटक करण्यात आली. (तालुका प्रतिनिधी)
शहरात खळबळ
शहरातील उच्चभ्रूच्या मुला-मुलींमध्ये घडलेल्या या घटनेची शहरात जोरदार चर्चा होती. शुक्रवारी रात्री मोठ्या प्रमाणात शहरातील गर्भश्रीमंत व राजकीय नेते पोलीस ठाण्यात आले होते. हा सर्व प्रकार अनेक दिवसांपासून सुरू असून अखेर कंटाळून पोलिसात तक्रार करण्यात आल्याची माहिती आहे.