माजी मुख्याधिकारी कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:18 IST2021-02-26T04:18:38+5:302021-02-26T04:18:38+5:30

परतवाडा : अचलपूर नगर परिषदेचे माजी प्रभारी मुख्याधिकारी सुमेध अलोणे कोरोना संक्रमित निघाले आहेत. यापूर्वी त्यांची दोन्ही ...

Former Chief Corona Positive | माजी मुख्याधिकारी कोरोना पॉझिटिव्ह

माजी मुख्याधिकारी कोरोना पॉझिटिव्ह

परतवाडा : अचलपूर नगर परिषदेचे माजी प्रभारी मुख्याधिकारी सुमेध अलोणे कोरोना संक्रमित निघाले आहेत. यापूर्वी त्यांची दोन्ही मुले कोरोना संक्रमित निघाल्याने ते वैद्यकीय रजेवर गेलेत. त्यांचा अतिरिक्त प्रभार मोर्शी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी गीता ठाकरे यांच्याकडे तीन दिवसांपूर्वीच सोपविण्यात आला आहे.

कोरोना संक्रमितांची वाढती संख्या आणि होत असलेले मृत्यू बघता अचलपूर नगरपरिषद प्रशासनासह नगरसेवकही ॲक्शन मोडमध्ये आले आहे. मुख्याधिकारी गीता ठाकरे आपल्या कर्मचाऱ्यांसह सकाळपासूनच सक्रिय होत आहेत. नागरिकांना समजावून सांगण्यापासून तर दंडात्मक कारवाई करण्यापर्यंत त्या स्वत: लक्ष देऊन आहेत. त्यांच्या मार्गदर्शनात नगरपरिषदेची सहा पथके पोलिसांच्या उपस्थितीत संबंधित दोषीवर, नियम मोडणाऱ्यावर कारवाई करीत आहेत.

स्थानिक नागसेन नगरातील ६९ वर्षीय पुरुषाचा जिल्हा कोविड रुग्णालयात उपचारादरम्यान २४ फेब्रुवारीला मृत्यू झाला. त्याच दिवशी शहरासह तालुक्यात ५० वर कोरोना संक्रमितांची नोंद घेण्यात आली. निर्जंतुकीकरणाच्या प्रक्रियेनेही शहरात जोर पकडला आहे. स्वत: नगरसेवक यात सक्रिय झाले आहेत. नगरसेवक गोवर्धन मेहरे, अक्षरा लहाणे यांनी आपल्या प्रभागात निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया पूर्णत्वास नेली आहे.

Web Title: Former Chief Corona Positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.