चांदूर बाजारात कोरोनावर उपाययोजनांचा विसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 05:00 IST2020-06-23T05:00:00+5:302020-06-23T05:00:13+5:30
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने नागरिकांसाठी काही उपाययोजना जाहीर केल्या आहे. याचे पालन करणे प्रत्येक नागरिकांना बंधनकारक आहे. मात्र, तालुक्यातील बाजारपेठ खुली होताच नागरिकांनी पुन्हा एकच गर्दी केली आहे. दुचाकीवर सर्रास विनामास्क दोन-तीन व्यक्ती फिरत असून त्यांच्यावर कारवाई केली जात नाही.

चांदूर बाजारात कोरोनावर उपाययोजनांचा विसर
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूर बाजार : तालुक्यात कोरोनाचा अद्याप एकही रुग्ण नसल्याने आजपासून चांदूरबाजार शहर व ग्रामीण भागातील व्यापारी प्रतिष्ठाने उघडण्यात आली आहे. यामुळे नागरिक बिनधास्त झाले आहे. मात्र नागरिकांनतर्फे मास्क न लावने तसेच फिजिकल डिस्टन्ससारख्या नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे. यामुळे संबंधित विभागाला कार्यवाहीची विसर पडल्याची चर्चा स्थानिक नागरिकांतर्फे वर्तविली जात आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने नागरिकांसाठी काही उपाययोजना जाहीर केल्या आहे. याचे पालन करणे प्रत्येक नागरिकांना बंधनकारक आहे. मात्र, तालुक्यातील बाजारपेठ खुली होताच नागरिकांनी पुन्हा एकच गर्दी केली आहे. दुचाकीवर सर्रास विनामास्क दोन-तीन व्यक्ती फिरत असून त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. प्रवासी ऑटोमध्ये ऑटोचालक विनामास्क, परवानगी पेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करीत आहे. याकडे पोलीस प्रशासनाने हेतुपुरस्सर डोळेझाक करीत असल्याचा आरोप नागरिकांतर्फे केला जात आहे.
सध्या शेतात पेरणीच्या कामांमुळे अनेक नागरिक शहरात शेती साहित्य खरीदी करण्यासाठी गर्दी करीत आहे. अशातच शहरातील अनेक नागरिक विनामास्क सर्रास वावरत आहेत. त्यांचावर पालिका प्रशासनातर्फे कुठलीच कारवाई केली जात नाही. अनेक फळविक्रेते शासनाच्या कोणत्याच नियमाचे पालन करीत नसतानाही याविरुद्ध कार्यवाही करणारी यंत्रणा गायब झाल्याचे चित्र आहे. सुरुवातीला पालिका, महसूल, व पोलीस प्रशासनाने शहरात दंडात्मक कारवाई केली होती. त्यानंतर शहरात तीन कोरणा रुग्ण आढळून आल्यानंतर कोरोनाची साखळी तोडण्याकरिता ६ दिवसांचे कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर ६ दिवस सम-विषम पद्धतीने मार्केटमधील एक-एक लाईनमधील दुकाने खुली करण्यात आली. आता परिस्थिती पूर्वपदावर आलेली आहे. यात सर्व शासकीय कार्यालये व इतर कार्यालय सुरू झाल्याने अमरावती शहरातील कर्मचाऱ्यांचे तसेच नागरिकांची अप-डाऊन करणाºयाची संख्या वाढत आहे. अशात अमरावती येथे कोरोनाने संपूर्ण शहरात जाळे पसरविले आहे. यात जिल्ह्यातून ग्रामीण भागात कोरोनाने पुन्हा डोके वर कडू नये याकरिता नागरिकांनी स्वत: खबरदारी घेणे गरजेचे वाटू लागले आहे. यावर लक्ष ठेवन्ण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यन्वित करणेसुद्धा काळाची गरज आहे, अशी मागणी स्थानिक नागरिकांतर्फे होत आहे.