पुण्यतिथीला महात्मा गांधींचा विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:23 IST2021-02-05T05:23:04+5:302021-02-05T05:23:04+5:30

फोटो पी ३१ महात्मा गांधी मोर्शी : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीदिनी त्यांच्या प्रतिमेस कोणी साधा पुष्पहारदेखील वाहिला नाही. ...

Forget Mahatma Gandhi on Punyatithi | पुण्यतिथीला महात्मा गांधींचा विसर

पुण्यतिथीला महात्मा गांधींचा विसर

फोटो पी ३१ महात्मा गांधी

मोर्शी : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीदिनी त्यांच्या प्रतिमेस कोणी साधा पुष्पहारदेखील वाहिला नाही. कुणी नमनही केले नाही. येथील जयस्तंभ चौकातील सोशल क्लबच्या मैदानावरील महात्मा गांधींचा पुतळा ३० जानेवारी रोजी हार व अभिवादनाविना राहिला.

३० जानेवारी रोजी महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त हुतात्मा दिन साजरा केला जातो. त्यांच्या पुतळ्याला, प्रतिमेला माल्यार्पण केले जाते. स्थानिक स्वराज्य संस्थांसह शाळा, महाविद्यालयातही अभिवादन केले जाते. मात्र, नगरपलिकेकडे जबाबदारी असलेल्या येथील महात्मा गांधीच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्याचे सौजन्य पालिका प्रशासनाने दाखविले नाही. महात्मा गांधीजींची पुण्यतिथी शासकीय कार्यक्रमात समाविष्ट आहे. मात्र, मोर्शी येथील पुतळा अभिवादनाविना व हाराविना राहिल्याने मोर्शीकरांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत मोर्शी पालिकेच्या मुख्याधिकारी गीता ठाकरे यांच्याशी संपर्क साधला असता, तो होऊ शकला नाही.

कोट

दरवर्षी सोशल क्लबमध्ये पुण्यतिथीचा शासकीय कार्यक्रम केला जातो. यंदा का करण्यात आला नाही, त्याबाबत प्रशासनास विचारणा करू.

मेघना मडघे,

नगराध्यक्ष, मोर्शी

Web Title: Forget Mahatma Gandhi on Punyatithi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.