वन कर्मचाऱ्यांची जंगलात पाळत

By Admin | Updated: September 30, 2014 23:30 IST2014-09-30T23:30:26+5:302014-09-30T23:30:26+5:30

दसऱ्याला पे्रम भावना व्यक्त करण्याकरिता आपट्याचे पान देण्याची प्रथा आहे. मात्र ही आपट्याची पाने जंगलातील वृक्ष तोड करुन विक्री करण्यास आणली जाते. त्यामुळे जंगलाचा ऱ्हास थांबविण्यासाठी

Forest workers are kept in the forest | वन कर्मचाऱ्यांची जंगलात पाळत

वन कर्मचाऱ्यांची जंगलात पाळत

अमरावती : दसऱ्याला पे्रम भावना व्यक्त करण्याकरिता आपट्याचे पान देण्याची प्रथा आहे. मात्र ही आपट्याची पाने जंगलातील वृक्ष तोड करुन विक्री करण्यास आणली जाते. त्यामुळे जंगलाचा ऱ्हास थांबविण्यासाठी वनविभाग प्रयत्न करित आहे. त्या अनुषंगाने वडाळी वनपरिक्षेत्रातील जंगलाची पाळत ठेवण्याकरिता दोन पथके सज्ज करण्यात आले आहे.
दसरा सण म्हटला की सर्वांनाच सोन्याची आठवण येते. आपट्याच्या पान सोन्याचे प्रतीक म्हणून उपयोग करण्यात येते. दसऱ्यात प्रेमाच्या भावना व्यक्त करण्यासाठी प्रत्येक जण आपट्याचे पान दुसऱ्याला भेट देऊन प्रेमभावना व्यक्त करतात. मात्र हे आपट्याचे पान कोठून आणल्या जाते व कसे आणल्या जाते. याकडे कोणीही लक्ष देत नाहीत. आपट्याचे वृक्ष गेल्या काही वर्षात दुर्मिळ होत चालले आहे. अमरावती शहराजवळील जंगलात आमट्याच्या वृक्षांचे संवर्धन वनविभागाकडून करण्यात आले आहे. मात्र दरवर्षी दसऱ्यानिमित्त अनेक जण आपट्याच्या पानाची विक्री करण्याच्या बेतात जंगलातील आपट्याचे वृक्ष तोड करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे जंगलातील आपट्याचे वृक्ष दुर्मिळ होताना दिसून येत आहे. त्या अनुषंगाने यंदा वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी पी. के. लाकडे यांनी वन कर्मचाऱ्यांची दोन पथके तयार केली आहे. प्रत्येक पथकात दोन वनपाल, चार वनरक्षक व दोन वन मजुरांचा सहभाग राहणार आहे.

Web Title: Forest workers are kept in the forest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.