वनगुन्ह्यात जप्त पोकलेन सरकार जमा करण्यास वन अधिकाऱ्याचा नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:18 IST2021-09-09T04:18:00+5:302021-09-09T04:18:00+5:30

अनिल कडू परतवाडा (अमरावती) : अंजनगाव वनपरिक्षेत्रातील राखीव वनात, वन उत्पादनाचे (गाळ, मुरूम) विनापरवानगी उत्खनन करण्याच्या वनगुन्ह्यात जप्त पोकलेन ...

Forest officials refuse to deposit confiscated Poklen government in forest crime | वनगुन्ह्यात जप्त पोकलेन सरकार जमा करण्यास वन अधिकाऱ्याचा नकार

वनगुन्ह्यात जप्त पोकलेन सरकार जमा करण्यास वन अधिकाऱ्याचा नकार

अनिल कडू

परतवाडा (अमरावती) : अंजनगाव वनपरिक्षेत्रातील राखीव वनात, वन उत्पादनाचे (गाळ, मुरूम) विनापरवानगी उत्खनन करण्याच्या वनगुन्ह्यात जप्त पोकलेन सरकारजमा करण्यास सहाय्यक वनसंरक्षकांनी नकार दिला आहे.

अंजनगाव वनपरिक्षेत्रातील राखीव वनात हा गुन्हा घडल्याचे, वनविभागाची परवानगी न घेता राखीव वनात पोकलेन द्वारे अवैध उत्खनन करून संबंधितांनी ट्रकद्वारे गाळ व मुरमाची अवैध वाहतूक केल्याचे तसेच मुरुमाचे (वनउत्पादन) उत्खनन करून नैसर्गिक नाल्यांमध्ये टाकून नाल्यामध्ये अडथळा निर्माण केल्याचे सहायक वनसंरक्षकांना मान्य आहे. मेळघाट प्रादेशिक वनविभाग, परतवाडा येथील वनसर्व्हेअर आणि वनपरिक्षेत्र अधिकारी, अंजनगाव यांच्यासह संबंधित वनरक्षक व वनपालाचे स्पष्ट अहवालही आहेत. यात प्रत्यक्षदर्शी दोन साक्षीदारही आहेत. असे असूनही जप्त पोकलेनद्वारे राज्य शासनाची मालमत्ता असलेल्या इमारती लाकूड, चंदन लाकूड, जळाऊ लाकूड, कोळसा किंवा इतर अधिसूचित वनउत्पादन यांच्याबाबत वन गुन्हा घडलेला नाही, असे नमूद करून जप्त पोकलेन सरकारजमा करण्याबाबतचा वनपरिक्षेत्र अधिकारी, अंजनगाव यांचा अर्ज २८ जुलै २०२१ रोजी सहायक वनसंरक्षकानी फेटाळला. असे करताना जैवविविधता कायद्याचा मात्र त्यांना विसर पडला.

----------------

असा घडला वनगुन्हा

संबंधितांनी राखीव वनातील सर्व्हे क्रमांक ०५ मधील सावरपाणी धरणातून वनउत्पादनाचे पोकलेन मशीनच्या साहाय्याने अवैधरीत्या उत्खनन केले. विनापरवानगी राखीव वनखंड क्रमांक १०६५ आणि १०६६ मध्ये नवीन रस्ता तयार केला. वनउत्पादनाची वनाबाहेर वाहतूक केली. यावरून २१ एप्रिल २०२१ रोजी वनगुन्हा नोंदविला गेला.

---------------

परवानगी आधीच सर्व काही

वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी १७ एप्रिल २०२१ ला मोका स्थळाची पाहणी केली तेव्हा त्यांना परवानगीआधीच सावरपाणी धरणातून गाळ/मातीची वाहतूक केल्याचे निदर्शनास आले. या वाहतुकीकरिता नवीन कच्चा रस्ता तयार केल्याचेही त्यांना आढळून आले. सदर उत्खनन केलेले ठिकाण व नवीन कच्चा रस्ता तयार केलेले ठिकाण हे वनजमीन असल्याचेही त्यांच्या निदर्शनास आले.

----------------

राखीव वनात घडला गुन्हा

वनपरिक्षेत्र अधिकारी अंजनगाव आणि वनविभागाच्या विभागीय कार्यालयातील वनसर्व्हेअर व वन कर्मचाऱ्यांनी २१ एप्रिल २०२१ ला परत घटनास्थळी जाऊन तपासणी केली. तपासणीमध्ये त्यांना उत्खनन झालेले ठिकाण हे चिंचोना नियत क्षेत्रातील सर्वे क्रमांक ०५ मधील राखीव वनात झाल्याचे आढळून आले. नवीन तयार करण्यात आलेल्या कच्चा रस्ता हा सावरपाणी नियतक्षेत्रातील वन खंड क्रमांक १०६५ व १०६६ मधील राखीव वनात तयार केल्याचेही त्यांना आढळून आले.

Web Title: Forest officials refuse to deposit confiscated Poklen government in forest crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.