वनविभागाने आडजात लाकडाचा ट्रक पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:12 IST2021-01-23T04:12:25+5:302021-01-23T04:12:25+5:30
परतवाडा : चांदूरबाजारवरून आकोटकडे जात असलेल्या आडजात लाकडाच्या ट्रकला अचलपूर-चांदूरबाजार नाक्यावर वनाधिकाऱ्यांनी पकडले. यात त्या ट्रकसह लाखो रुपयांचा माल ...

वनविभागाने आडजात लाकडाचा ट्रक पकडला
परतवाडा : चांदूरबाजारवरून आकोटकडे जात असलेल्या आडजात लाकडाच्या ट्रकला अचलपूर-चांदूरबाजार नाक्यावर वनाधिकाऱ्यांनी पकडले. यात त्या ट्रकसह लाखो रुपयांचा माल वनअधिकाऱ्यांनी जप्त केला आहे.
देऊरवाडा शेतशिवारात विनापरवानगी तोडल्या गेलेल्या आडजात वृक्षाचे लाकूड घेऊन ट्रक क्रमांक एमएच २०/एटी ९१४५, आकोटकडे जात होता. हा ट्रक गुरुवारी (दि. २१) अचलपूर-चांदूरबाजार नाक्यावर वनाधिकाऱ्यांनी सायंकाळी ताब्यात घेतले.
अमरावती वन विभागाचे मोबाईल स्क्वाड आरएफओ पी. आर. भुजाडे, परतवाडा वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप भड, वनपाल के. डी. काळे, वनरक्षक नितीन अहिरराव, प्रशांत उमक यांनी ही कारवाई केली.
ट्रकमध्ये काटसावर व महारूक लाकडाचे ३० नग आढळून आलेत. यात ट्रक ड्रायव्हर फिरोज खाँ शब्बीर खाँ (वय ३८, रा. आकोट) याला ताब्यात घेण्यात आले आहे. ही झाडे संबंधितांनी विनापरवानगी तोडली आहेत.