वनविभागाने चालविला राहुट्यांवर बुलडोजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 05:01 IST2020-06-28T05:00:00+5:302020-06-28T05:01:05+5:30
चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या चिरोडी वर्तुळातील दक्षिण चिरोडी बीट वनखंड क्रमांक ३०५ मध्ये काठियावाडी पशुपालकांनी पावसाळ्यापूर्वीच आपल्या राहुट्या तयार करून घेतल्या होत्या. त्यानंतर ते हजारोंच्या संख्येतील गुरांसह दाखल झाले. या राहुट्या आणि पशूंची चराई वनक्षेत्रात होत असल्याचे ‘लोकमत’ने लक्षात आणून दिले होते, हे येथे विशेष. त्यावरून चांदूर रेल्वे वनविभागाने काठियावाडींना नोटीस बजावली. मात्र, ते ठाम होते.

वनविभागाने चालविला राहुट्यांवर बुलडोजर
लोकमत न्यूज नेटवर्क
पोहरा बंदी : वनजमिनीवर राहुट्या टाकून वनक्षेत्रात गुरे चारणाऱ्या काठियावाडी पशुपालकांना चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी हादरा दिला. त्यांच्यासह गुरांना वनक्षेत्राबाहेर काढून ते वास्तव्य करीत असलेल्या जागी बुलडोजरने चर खणण्यास सुरुवात केली आहे. शुक्रवारी सुरू झालेली ही कारवाई शनिवारीदेखील सुरू होती.
चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या चिरोडी वर्तुळातील दक्षिण चिरोडी बीट वनखंड क्रमांक ३०५ मध्ये काठियावाडी पशुपालकांनी पावसाळ्यापूर्वीच आपल्या राहुट्या तयार करून घेतल्या होत्या. त्यानंतर ते हजारोंच्या संख्येतील गुरांसह दाखल झाले. या राहुट्या आणि पशूंची चराई वनक्षेत्रात होत असल्याचे ‘लोकमत’ने लक्षात आणून दिले होते, हे येथे विशेष. त्यावरून चांदूर रेल्वे वनविभागाने काठियावाडींना नोटीस बजावली. मात्र, ते ठाम होते.
अखेर वनपरिक्षेत्र अधिकाºयांच्या नेतृत्वात बुलडोजर राहुट्यांवर चालला. या ठिकाणी चर खोदून यापुढे वास्तव्य होणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे. पशुपालक गुरांसह वर्धेकडे गेल्याचे सूत्रांची माहिती आहे.
पाच राहुट्या, एक हेक्टर क्षेत्र
दक्षिण चिरोडी बीटच्या परिसरात एकूण पाच राहुट्यांमध्ये पशुपालकांचे वास्तव्य होते. गुरे कोंडण्यासाठी सुमारे एक हेक्टर क्षेत्र त्यांनी साफ करून ठेवले होते.
यांनी केली कारवाई
वनपरिक्षेत्र अधिकारी आशिष कोकाटे यांच्या नेतृत्वात चिरोडी प्रभारी वर्तुळ अधिकारी रवींद्र विधळे, वनरक्षक अभिजित बगळे, अतुल धस्कट, गोविंद पवार, राजन हिवराळे, वनमजूर शालिक पवार, राजू चव्हाण, मंगल जाधव यांनी कारवाई केली.