लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मानवी वस्तीत शिरकाव करून धुमाकूळ घातलेल्या कोरोना या विषाणूचा संसर्ग वनातील वन्यजिवांना होण्याच्या शक्यता लक्षात घेता केंद्रीय वनमंत्रालयाने सर्व राज्यांना अलर्ट दिलेला आहे. वनात कोरोनाने शिरकाव करू नये, याकरिता खबरदारी घेण्याबाबत अवगत केले आहे.कोरोना या विषाणूचा मनुष्याला जेवढा धोका आहे, तेवढाच धोका वनातील प्रत्येक वन्यजीव व पाळीव जनावरांना असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. कोरोनाचा शिरकाव गावालगतच्या वनात होण्याची भीती आता निर्माण झालेली आहे. त्यामुळे केंद्रीय वन, पर्यावरण व हवामान बदल मंत्रालयाचे सहसंचालक डॉ. आर. गोपीनाथ यांनी ६ एप्रिल रोजी महत्त्वाचे पत्र राज्यांच्या प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव विभाग) यांना पाठविले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव व्याघ्र प्रकल्प, अभयारण्य, वन्यजीव उद्यानात होणार नाही. याबाबत गांभीर्याने कार्य करण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोविड-१९ मुळे वाघ, बिबट व इतर वन्यजिवांमध्ये संसर्ग पसरू शकतो. त्यामुळे वनातसुद्धा आपत्कालीन परिस्थिती उद्भवू शकते आणि हा संसर्ग मानवापासून वन्यजिवांना होण्याची शक्यता वर्तविली आहे. वनालगत असलेली गावे वनापासून संरक्षित करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहे. विशेषत: व्याघ्र प्रकल्प व अभयारण्य असलेल्या भागात वनविभागाने पोलिसांप्रमाणे पहारा सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत, शिवाय ध्वनिप्रक्षेपणातून सूचना दिली जात आहे.मानवी संपर्क रोखाकोरोना विषाणूची साखळी रोखण्यासाठी शहर, गावागावांत लॉकडाऊन करण्यात आले आहे. वनक्षेत्रानजीकच्या खेड्यांवर बारीक लक्ष ठेवून वनालगतचे नागरिक वनात शिरकाव करणार नाहीत, यासाठी स्थानिक वन कर्मचाऱ्यांनी सूक्ष्म लक्ष ठेवावे आणि योग्य त्या उपाययोजना आखाव्यात, जेणेकरून मानवाचा वनाशी असलेला संपर्क तुटला पाहिजे, अशी भूमिका राहणार आहे. व्याघ्र प्रकल्प व अभयारण्यात अपप्रवेश करणाºयास अटक करण्यासाठी वनविभागाने पुढाकार घेण्याची शक्यता आहे.वन्यजीव बाधित झाल्यासमानवी हस्तक्षेपामुळे एखाद्या वन्यजिवास कोरोनाची लागण झाल्यास त्या ठिकाणी वनविभागाचे स्पेशल फोर्स, पशुवैद्यकीय अधिकारी, व्यवस्थापन कर्मचारी, वनाधिकारी यांनी त्वरीत कृती करून अशा संकटाशी दोन हात करावे व परिस्थिती हाताबाहेर जाणार नाही, याची खबरदारी घ्यावी. आपत्कालीन सेवा म्हणून वन्यजिवास कोरोनाची लागण दिसून आल्यास सॅम्पल संसर्ग विभागास पाठविण्याची कामे करावी लागेल, यासाठी आरोग्य विभागाची मदत मिळणार आहे. वन्यजिवांनासुद्धा कोरोनाची लागण होण्याची शक्यता असल्याने वनविभाग अलर्ट आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वनविभाग 'अलर्ट'; केंद्रीय वनमंत्रालयाचे राज्यांना निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2020 21:13 IST
मानवी वस्तीत शिरकाव करून धुमाकूळ घातलेल्या कोरोना या विषाणूचा संसर्ग वनातील वन्यजिवांना होण्याच्या शक्यता लक्षात घेता केंद्रीय वनमंत्रालयाने सर्व राज्यांना अलर्ट दिलेला आहे. वनात कोरोनाने शिरकाव करू नये, याकरिता खबरदारी घेण्याबाबत अवगत केले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वनविभाग 'अलर्ट'; केंद्रीय वनमंत्रालयाचे राज्यांना निर्देश
ठळक मुद्देवन्यजीवांची खबरदारी घेण्याच्या सूचना