‘फॉरेन रिटर्न’ ३५ व्यक्तींची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 06:00 AM2020-03-18T06:00:00+5:302020-03-18T06:00:19+5:30

कोरोना विषाणूचा जिल्ह्यात शिरकाव होऊ नये, याच्या पूर्वनियोजनाच्या दृष्टीने जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा-२००५ लागू केला. यातंर्गत १२ मार्चला पर्यटन व्यवसायाशी संबंधित व्यावसायिकांची बैठक बोलाविली होती. या व्यावसायिकांना देशात व परदेशात गेलेल्या आणि जिल्ह्यात परतलेल्या व आगामी काळात परतणाऱ्या नागरिकांची माहिती मागितली.

'Foreign Return' inspection of 35 persons | ‘फॉरेन रिटर्न’ ३५ व्यक्तींची तपासणी

‘फॉरेन रिटर्न’ ३५ व्यक्तींची तपासणी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यात २५ फेब्रुवारी ते १६ मार्च दरम्यान परदेशातून परतलेल्या नागरिकांची माहिती टूर्स अँड ट्रॅव्हल्स असोसिएशन (अट्टा) द्वारे जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली. या सर्व नागरिकांची वैद्यकीय पथकाद्वारे तपासणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी मंगळवारी दिले आहेत. या सर्व प्रवाशांसोबत सौजन्याने बोला व आवश्यकता असल्यास क्वारंटाइन कक्षात किंवा स्वत:च्या घरीच स्वतंत्रपणे ठेवण्याच्या सूचना आहेत.
कोरोना विषाणूचा जिल्ह्यात शिरकाव होऊ नये, याच्या पूर्वनियोजनाच्या दृष्टीने जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा-२००५ लागू केला. यातंर्गत १२ मार्चला पर्यटन व्यवसायाशी संबंधित व्यावसायिकांची बैठक बोलाविली होती. या व्यावसायिकांना देशात व परदेशात गेलेल्या आणि जिल्ह्यात परतलेल्या व आगामी काळात परतणाऱ्या नागरिकांची माहिती मागितली. या अनुषंगाने पहिली ८९ व दुसरी ३५ नागरिकांची यादी ‘अट्टा’ने जिल्हा प्रशासनाला दिली. पहिल्या यादीतील नागरिकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये कुणालाही आयसोलेशन किंवा क्वारंटाइनमध्ये ठेवण्याची गरज नसल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.
आता दुसºया यादीतील नागरिकांची तपासणी सुरू झालेली आहे. यादीमधील बरेचसे नागरिक स्वत:हून तपासणी करून घेत असल्याचे दिसून येत आहे.

डीपीसीतून २.५९ कोटींच्या वैद्यकीय साहित्याची मागणी
जिल्हा नियोजन समितीमधून कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी २.५९ कोटी रुपयांच्या वैद्यकीय साहित्य व उपकरणाची मागणी जिल्हा शल्यचिकित्सकांनी जिल्हाधिकारी तथा डीपीसीचे सचिव शैलेश नवाल यांच्याकडे केली. यामध्ये ११ न्यूनॅटल व्हेंटिलेटर मागणी केली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचे पथकाला आदेश : आवश्यकता असल्यास क्वारंटाईनमध्ये
दुसऱ्या यादीत या देशात झाला प्रवास
‘अट्टा’ने दिलेल्या दुसऱ्या यादीत कतार एअर लार्इंन्सने १५, एअर अरेबियाने २० नागरिकांनी प्रवास केला आहे. जॉर्जिया, बहरीन, बाकू, शारजाह, यूएई, कतर, बोस्टन, दोहा, डल्लास, साओपोलो, ओमान, यूएसए, दुबई, कुवैत, स्टॉकहोम आदी देशांतंर्गत २५ फेब्रुवारी ते १६ मार्च दरम्यान त्या देशात प्रवास केल्याची माहिती ‘अट्टा’ने दिली असल्याने त्यासंबंधी तपासणी सुरू झाली आहे.

Web Title: 'Foreign Return' inspection of 35 persons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.