आरक्षित जागा गिळंकृत करणाऱ्यांवर फौजदारी
By Admin | Updated: October 27, 2015 00:11 IST2015-10-27T00:11:36+5:302015-10-27T00:11:36+5:30
विविध विकास कामांसाठी आरक्षित जागा न्यायालयाचा आधार घेत बिल्डर्स लॉबीच्या घशात टाकण्याचे कटकारस्थान शोधून काढावे, ..

आरक्षित जागा गिळंकृत करणाऱ्यांवर फौजदारी
अधिकारी, पॅनेलवरील वकील रडारवर : भारतीय यांचे महापालिकेला पत्र
अमरावती : विविध विकास कामांसाठी आरक्षित जागा न्यायालयाचा आधार घेत बिल्डर्स लॉबीच्या घशात टाकण्याचे कटकारस्थान शोधून काढावे, असे पत्र भाजपचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक तुषार भारतीय यांनी महापालिकेला दिले आहे. याप्रकरणी अधिकारी, पॅनेलवरील वकिलांच्या भूमिकेवरही बोट ठेवण्यात आले असून दोषींवर फौजदारीची मागणी केली आहे.
नगरसेवक तुषार भारतीय यांनी महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांना दिलेल्या पत्रानुसार, महानगरात आरक्षित जागा असल्या तरी त्या जागांवर आरक्षण विकसित होऊ नये, यासाठी प्रयत्न करणारी अशी एक लॉबी महापालिकेत कार्यरत असल्याचा आरोप तुषार भारतीय यांनी पत्राद्वारे केली आहे.
पाच वर्षांपासून आतापर्यंतच्या जागांचे आरक्षण काढल्याबाबतची माहिती मागितली आहे. यात सर्वे क्रमांकासह मूळ मालकाचे नाव, ले-आऊट धारकाचे नाव, आरक्षणाची कारणे मागितली आहेत. आरक्षित जागा गिळंकृत करणारे मास्टर मार्इंड कोण? हे लवकरच उघडकीस येईल.
- तुषार भारतीय,शहराध्यक्ष, भाजपा.