काफीला हुक्का पार्लरवर धाड
By Admin | Updated: June 20, 2017 00:03 IST2017-06-20T00:03:46+5:302017-06-20T00:03:46+5:30
अड्डा २७ या हुक्का पार्लरच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्यानंतर पुन्हा तोंड वर काढणाऱ्या काफीला हुक्का पार्लरवर....

काफीला हुक्का पार्लरवर धाड
गुन्हे शाखेची कारवाई : दोन संचालक अटकेत, १२ तरुण ताब्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : अड्डा २७ या हुक्का पार्लरच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्यानंतर पुन्हा तोंड वर काढणाऱ्या काफीला हुक्का पार्लरवर पोलिसांनी कारवाई करीत दोन संचालकांना अटक केली. प्रमेंद्र ओमप्रकाश शर्मा (४८) व प्रणय प्रमेंद्र शर्मा (२५) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. आस्था कॅफे अॅन्ड रेस्टॉरेंटच्या नावाने चालणाऱ्या या हुक्का पार्लरमध्ये दम लावणाऱ्या १२ तरुणांना ताब्यात घेतले होते.
रविवारी गुन्हे शाखेचे प्रमेश आत्राम यांच्या मार्गदर्शनात पीएसआय आशिष देशमुख, राजेंद्र चाटे, संजय वानखडे, ओमप्रकाश देशमुख, विजय पेठे, नीलेश पाटील, सुभाष पाटील, सुनील बाजगिरे यांनी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास या हुक्का पार्लरवर धाड टाकून हुक्काचे सहा पॉट व विविध फ्लेवरचे साहित्य जप्त केले. पोलिसांनी संचालकांची चौकशी केली असता त्यांच्याजवळ आस्था कॅफे अॅन्ड रेस्टॉरेंट नावाने महापालिका व शॉप अॅक्टची नोंदणी असल्याचे आढळले. या प्रकरणात रात्री उशिरा गुन्हे दाखल करण्यात आले.
अड्डा २७ वर कारवाई केव्हा ?
अड्डा- २७ या हुक्का पार्लरचे प्रकरण कोतवालीत प्रलंबित आहे. महिना ओलांडून गेला. अद्यापपर्यंत पोलीस कारवाईसाठी पाऊल उचलेले नाही. पोलिसांनी सरकारी कामगार अधिकारी डी.बी.जाधव यांचे तीन तास बयाण नोंदविले. मात्र, अद्यापही कारवाईत झाली नाही, हे विशेष.