शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त अन्नदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:10 IST2021-06-21T04:10:03+5:302021-06-21T04:10:03+5:30

अंजनगाव सुर्जी : जिल्हाप्रमुख दिनेश बूब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या ५५व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून शहरप्रमुख प्रवीण नेमाडे ...

Food donation on the occasion of Shiv Sena's anniversary | शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त अन्नदान

शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त अन्नदान

अंजनगाव सुर्जी : जिल्हाप्रमुख दिनेश बूब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या ५५व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून शहरप्रमुख प्रवीण नेमाडे व युवासेना शहरप्रमुख अक्षय गवळी यांनी अंजनगाव सुर्जीमधील पांढरीस्थित कोविड सेंटरमध्ये जाऊन कोरोनाग्रस्त रुग्णांना व ग्रामीण रुग्णालय येथील रुग्णांना तसेच शहरातील रोडवरील फिरणाऱ्या गरजूंना जेवण वाटप केले. तसेच त्यांची तब्येतीबद्दल आस्थेने विचारपूस केली. कुठलीही गर्दी न करता, सोशल डिस्टन्सिंग पाळत एकदम साधेपणाने कार्यक्रम पार पडला. यावेळी आकाश येऊल, अंकुश दातीर, प्रवीण बोडखे, अमोल फाटे, मयूर दातीर, अंकुश होटे, यदनेश जावरकर, राहुल ताडे, तुषार शर्मा, कान्हा छाटबार, मनोज ढगे, अक्षय काळमेघ, गौरव नेमाडे, तुषार गवळी, आदी शिवसैनिक उपस्थित होते.

Web Title: Food donation on the occasion of Shiv Sena's anniversary