पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्याने रेड्डी अखेर गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 05:00 AM2021-05-01T05:00:00+5:302021-05-01T05:00:58+5:30

दीपाली चव्हाण यांची आत्महत्या अतिशय वेदनादायक घटना होती. त्यामुळे याप्रकरणी दाेषी असलेल्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी भूमिका  सुरुवातीपासूनच घेतली. या अनुषंगाने मेळघाटात दोन दिवस दौरा करून कार्यरत महिला अधिकारी, कर्मचारी यांच्या अडचणी, समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर याप्रकरणी निष्पक्ष चौकशी व तात्काळ कारवाईची मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ३० मार्च रोजी प्रत्यक्ष भेटून दिले.

Following the Guardian Minister, Reddy finally disappeared | पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्याने रेड्डी अखेर गजाआड

पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्याने रेड्डी अखेर गजाआड

Next
ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांची भेट , मेळघाटात गोपनीय दौराही

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, हा संकल्प घेतला होता. त्या अनुषंगाने मेळघाटात महिला अधिकारी, कर्मचारी यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा केल्यानंतर प्रकरणातील क्रौर्य पुढे आले. मुख्यमंत्र्यांकडे सातत्याने उच्चस्तरीय चौकशीसाठी पाठपुरावा केला. परिणामी श्रीनिवास रेड्डी व विनोद शिवकुमार आज गजाआड आहेत, अशी माहिती पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली. 
दीपाली चव्हाण यांची आत्महत्या अतिशय वेदनादायक घटना होती. त्यामुळे याप्रकरणी दाेषी असलेल्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी भूमिका  सुरुवातीपासूनच घेतली. या अनुषंगाने मेळघाटात दोन दिवस दौरा करून कार्यरत महिला अधिकारी, कर्मचारी यांच्या अडचणी, समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर याप्रकरणी निष्पक्ष चौकशी व तात्काळ कारवाईची मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ३० मार्च रोजी प्रत्यक्ष भेटून दिले. दीपालीच्या मोरगाव येथील निवासस्थानी भेट देतानाही याप्रकरणी मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे म्हटले होते. प्रकरणाची मुख्यमंत्र्यांना माहिती देताना, सक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी केली. कर्मठ पोलीस अधिकारी म्हणून ओळख असलेल्या डॉ. प्रज्ञा सरवदे यांची प्राथमिक चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक हा या पाठपुराव्याचा परिपाक आहे. दोषींवर थेट कारवाई व्हावी, असे निर्देश सरवदे यांना दिले होते. जलदगती निष्पक्ष चौकशीची अपेक्षा त्यांनी पूर्ण केली, असे पालकमंत्री ठाकूर म्हणाल्या.
 

जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रालाही रेड्डींनी गांभीर्याने घेतले नाही
दीपाली यांच्या आत्महत्येपूर्वी त्यांच्याकडून काही निवेदने प्राप्त झाली होती. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना त्रयस्थ यंत्रणेमार्फत चौकशी करण्याचे निर्देशित केले होते. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी रेड्डी यांना पत्र दिले. परंतु, रेड्डींनी प्रतिसाद दिला नाही. आत्महत्याप्रकरणी जे दोषी असतील, त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, ही मागणी सुरुवातीपासूनच होती. त्यानुसार अगोदर विनोद शिवकुमार व आता रेड्डी यांना अटक झाली आहे. राज्य सरकारने कुणालाही वाचविण्याच्या प्रयत्नांना दाद दिलेली नाही, असे ना. ठाकूर म्हणाल्या.

 

Web Title: Following the Guardian Minister, Reddy finally disappeared

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.