रखडलेल्या योजना गतिमान करा
By Admin | Updated: March 5, 2017 00:16 IST2017-03-05T00:16:26+5:302017-03-05T00:16:26+5:30
प्रधानमंत्री आवास योजना, वैयक्तिक शौचालय, पार्कींग व्यवस्था, हॉकर्स झोन, मनपा शाळेची स्थिती, साफसफाई व्यवस्था, ...

रखडलेल्या योजना गतिमान करा
सुनील देशमुख : महापालिकेत आढावा बैठक
अमरावती : प्रधानमंत्री आवास योजना, वैयक्तिक शौचालय, पार्कींग व्यवस्था, हॉकर्स झोन, मनपा शाळेची स्थिती, साफसफाई व्यवस्था, मनपा दवाखान्याची स्थिती, वृक्षारोपण, बांधकाम परवानगी, मालमत्ता कर, मोकाट जनावरे आदी विषयांवर आ. सुनील देशमुख यांनी शनिवारी महापालिकेत आढावा घेतला.
शहरातील अतिक्रमणाबाबत अमरावती शहर पोलीस यंत्रणा व महापालिका अतिक्रमण विभाग यांनी समन्वयाने कार्यवाही करण्याचे आदेश दिले. नागरिकांना कोणताही त्रास न होता विकासकामे झाले पाहिजे. कामाचे नियोजन हे समन्वय ठेवूनच करावे. कोणतीही योजना राबविताना संबंधित विभागाने ज्या विभागाशी त्या योजनेचा संबंध येतो त्या विभागाला माहिती देवूनच कार्य सुरू करावे, आ. देशमुख म्हणाले.
राज्यशासनाकडे प्रलंबित असणाऱ्या विषयांची माहिती पुरविण्याचे त्यांनी यावेळी सूचना दिल्या. येत्या अधिवेशनात या विषयांवर चर्चा करून मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाईल. मनपाची अखत्यारीत येणाऱ्या अपूर्ण रस्त्याची कामे पूर्ण करण्यासाठी प्रशासनाला मदत करण्यात येईल. शहरात मोठ्या प्रमाणात कचरा जाळल्या जातो असा प्रकार घडू नये त्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने कठोर पावले उचलावी. प्रधानमंत्री आवास योजनेची गती वाढवण्यासाठी योग्य नियोजन करण्याची सूचना त्यांनी यावेळी दिली. वैयक्तिक शौचालयाच्या स्थितीची संपूर्ण माहिती देण्याचे निर्देश यावेळी दिले.
महापालिका दवाखान्याची स्थिती सुधारण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेटी देणे आवश्यक आहे. येत्या काळात मनपाच्या सर्व दवाखान्यांना भेटी देण्यात येईल. शहरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करणे हे काळाची गरज आहे. मनपातर्फे वृक्षारोपण कार्यक्रमाची तयारीही आतापासूनच झाली पाहिजे त्याच्यासाठी परिपूर्ण नियोजन करावे. शहरातील रस्ते दुभाजक झाडे लावून सुशोभित करावे. मनपा शाळेतील शिक्षकांची शिकवण्याची पद्धतीचे निरिक्षण होणे आवश्यक आहे. मनपा आयुक्तांनी यावेळी सानगितले की मनपा अधिकाऱ्यांना शाळेला भेटी देऊन त्या शाळेचा दर्जा तपासण्यात येईल. ज्या शिक्षकांनी आपल्या कामात हयगय केल्याचे आढळल्यास त्यांच्यावर प्रशासकिय कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल.
या बैठकीत मनपा आयुक्त हेमंतकुमार पवार, अतिरिक्त आयुक्त सोमनाथ शेटे, उपायुक्त विनायक औगड, नरेंद्र वानखडे, शहर अभियंता जिवन सदार, स.स.न.र. सुरेंद्र कांबळे, पर्यावरण अधिकारी महेश देशमुख, पशुशल्य चिकित्सक सुधीर गावंडे, मुख्य लेखापाल प्रेमदास राठोड, वैद्यकिय आरोग्य अधिकारी सीमा नेताम, सहाय्यक आयुक्त योगेश पिठे आदी उपस्थित होते.