फुलले कमलदल... :
By Admin | Updated: May 10, 2015 00:37 IST2015-05-10T00:37:12+5:302015-05-10T00:37:12+5:30
चहूकडे रूक्ष वाळवंटसदृश स्थिती आहे. उन्हामुळे काहिली होतेय अशावेळी दूरवर फुललेली ही कमलदले डोळ्यांना किती सुखावतात?

फुलले कमलदल... :
चहूकडे रूक्ष वाळवंटसदृश स्थिती आहे. उन्हामुळे काहिली होतेय अशावेळी दूरवर फुललेली ही कमलदले डोळ्यांना किती सुखावतात? वडाळी तलाव परिसरात उन्हाळ्यातही फुलले हे ‘कमलवन’ येथे येणाऱ्यांना आकर्षित करीत आहे. फिक्कट जांभळ्या रंगांची फुले हिरव्यागार पानांमधून डोकावताहेत. अनिमिष नेत्रांनी बघत रहावे, असे हे दृश्य. परिसरातील चिखलाचा आणि घाणीचाही ही कमलपुष्पे पाहून काही काळ विसर पडतो. चिखलातही स्वत:चा पारदर्शीपणा आणि सौंदर्य जपण्याचा संदेशच ही फुले देत असावीत.