जिल्ह्यात ४८७ गावे पूरप्रवण
By Admin | Updated: May 14, 2016 00:11 IST2016-05-14T00:11:20+5:302016-05-14T00:11:20+5:30
यंदाचा मान्सून अवघ्या काही दिवसांवर आला असल्याने आपत्ती, व्यवस्थापनाची कामे युद्धस्तरावर होणे गरजेचे आहे.

जिल्ह्यात ४८७ गावे पूरप्रवण
मान्सून तोंडावर : आपत्ती व्यवस्थापन दल गतिमान करण्याची गरज
गजानन मोहोड अमरावती
यंदाचा मान्सून अवघ्या काही दिवसांवर आला असल्याने आपत्ती, व्यवस्थापनाची कामे युद्धस्तरावर होणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील १९९० गावांपैकी तब्बल ४८७ गावे ही पूरप्रवण आहेत. या गावांमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ग्राम आपत्तीदल गठित करण्यात येणार आहे. बऱ्याच वेळा दुर्गम भागात पूर आल्यास त्या गावांना जोडणारे रस्ते पाण्याखाली येतात. त्यामुळे शोध व बचाव कार्यास अडथळा निर्माण होतो. ही अडचण लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापनाचे विकेंद्रीकरण करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.
केंद्र सरकारने सन २००५ मध्ये आपत्ती व्यवस्थापनाचा फायदा पारित केल्याने आपत्तीला सामोरे जाण्यासाठी प्रभावीपणे यंत्रणा सज्ज करणे याला कायदेशीर महत्त्व प्राप्त झाले आहे. आपत्तीमध्ये होणारी जीवित हानी व वित्तहानी कमी करण्यासाठी व आपत्तीचा प्रतिबंध करण्यासाठी आपत्तीपूर्व काळात करावयाची पूर्वतयारी यावर या कायद्यामध्ये विशेष भर देण्यात आला आहे. याअन्वये जिल्ह्याचा आपत्ती व्यवस्थापन विभाग अधिक गतिमान करण्याची गरज निर्माण झाली आहे.
जिल्ह्यातील महत्त्वाच्या नदी व नाले यांच्या काठावर ४२७ गावे ही पूरप्रवण आहे. पुळात अमरावती जिल्ह्याच शासनाच्या लेखी पूरप्रवण आहे. या गावांंमध्ये नागरिकांच्या सुरक्षेसाठी ग्राम आपली निवारण दल गठित करण्यात आले आहे. या दलामध्ये सरपंच उपसरपंच, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील, कोतवाल, आरोग्य सेवक, कृषी सहायक, स्वस्त धान्य दुकानदान, अंगणवाडी सेविका, गावातील पट्टीचे पोहणारे, ४ ते ६ युवक यांचा समावेश आहे.
या सर्व गावांमध्ये शोध व बचाव कार्य हाती घेता यावे याकरिता २ लाईफ जॅकेट, १ लाईफ बोया (रींग), १ मेगा फोन, १ सर्च लाईट, १ मीटरची दोरी हे साहित्य पुरविण्यात आले आहे. हे साहित्य जिल्हा प्रशासनाने जिल्हा आपत्ती मदत निधी मधून केले आहे.
उपविभागीय स्तरावर पुराच्यावेळी तातडीचे बचाव कार्य हाती घेण्यासाठी स्थानिक विकास निधीमधून ६ यांत्रिक बोटी खरेदी करण्यात आले आहेत. तहसील स्तरावर २७ सर्च लाईट, २७ मेगा फोन, ४ ईमजन्सी आॅक्सिजन कीट, १५ बॉब रोप, १५ इन्सुलेटेड फायरमन एक्स, ३० फायरमन इक्स्टींगुशर, ३० रबर ग्लोव्हज पेअर, ३० लेदर ग्लेव्हज, ६ बोट १११ लाईफ बॉय रिंंग, २०७ लाईफ जॅकेट, ५ ट्रँक, तालुक्यांना वितरित करण्यात आले आहेत.