‘शैलेंद्र चाट भंडार’च्या समोशात मांसाचा तुकडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2016 00:29 IST2016-12-30T00:29:26+5:302016-12-30T00:29:26+5:30

गांधी चौकातील ‘शैलेंद्र चाट भंडार’मध्ये नाश्ता करण्यास गेलेल्या ग्राहकाच्या समोस्यामध्ये चक्क

Flesh piece with 'Shailendra Chat Store' | ‘शैलेंद्र चाट भंडार’च्या समोशात मांसाचा तुकडा

‘शैलेंद्र चाट भंडार’च्या समोशात मांसाचा तुकडा

अमरावती : गांधी चौकातील ‘शैलेंद्र चाट भंडार’मध्ये नाश्ता करण्यास गेलेल्या ग्राहकाच्या समोस्यामध्ये चक्क मटणाचा अर्धवट खाल्लेला तुकडा आढळला. यामुळे संतप्त ग्राहकाने दुकानात गोंधळ घातला. याप्रकाराची तक्रार ग्राहकाने एफडीएकडे केली आहे. ही घटना गुरूवार २९ डिसेंबर रोजी घडली.
नागपूरचे मूळ रहिवासी व स्थानिक चक्रधर एजन्सीमध्ये नोकरी करणारे संदीप तिडके हे त्यांच्या दोन सहकाऱ्यांसह गुरूवारी सकाळी ११ वाजता गांधी चौकातील ‘शैलेंद्र चाट भंडार’मध्ये पोहोचले. त्यांनी एक प्लेट समोसा बनवून मागितला. एक-दोन घास खाल्ल्यानंतर त्यांना समोस्यात मटणाचा तुकडा आढळला. गुरूवारी मांसाहार निषिद्ध मानणारे संदीप तिडके यांचा संताप यामुळे अनावर झाला. त्यांनी दुकानाचे संचालक सुधीर मंगरोरिया यांच्यासह इतर ग्राहकांना तो तुकडा दाखविला. त्यामुळे काही वेळ गोंधळ उडाला होता.

खाद्यान्नांची विश्वासार्हता चव्हाट्यावर
रघुवीरच्या कचोरीत तळलेली अळी आढळली होती. त्यानंतर मनभरीच्या चिवड्यात तर चक्क तळलेली अख्खी पालच आढळली होती. या घटनांमुळे शहरात खळबळ उडाली होती. या घटना जुन्या होत नाहीत तोच कचोरीत गुटख्याचे पाऊच आढळले होते. त्यानंतर अगदी कालपरवा म्हणजे मंगळवारी सिलबंद भेळेच्या पाकिटात तळलेले पाच ते सहा झुरळ आढळले. या वृत्ताची शाई वाळत नाही तोच पुन्हा शैलेंद्र चाट भंडारच्या समोस्यात मटणाचा तुकडा आढळल्याने पुन्हा एकदा खाद्यपदार्थांची विश्वासार्हता चव्हाट्यावर आली आहे.

२० वर्षांपासून आम्ही या व्यवसायात आहोेत. कुटुंबाची धार्मिक पार्श्वभूमी असल्याने मांसाहार निषिद्ध मानतो. मग, ग्राहकांना ते कसे खाऊ घालणार. समोस्यात मांसाचा तुकडा कसा आढळला, याबाबत आम्ही स्वत:च अचंबित झालो आहोत.
-सुधीर मंगरोरिया, संचालक, शैलेंद्र चाट भंडार

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे गुरुवारी व्यस्तता होती. शुक्रवारी शैलेंद्र चाट भंडारला भेट देऊन अधिकारी चौकशी करतील.
-जयंत वाणे,
सहायक आयुक्त, अन्नप्रशासन

Web Title: Flesh piece with 'Shailendra Chat Store'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.