पोलीस आयुक्तांच्या हस्ते आयुक्तलयात ध्वजारोहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:27 IST2021-02-05T05:27:22+5:302021-02-05T05:27:22+5:30

अमरावती : २६ जानेवारी प्रजासत्ताकदिनी पोलीस आयुक्तालयात पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रपती पोलीस ...

Flag hoisting at the hands of the Commissioner of Police | पोलीस आयुक्तांच्या हस्ते आयुक्तलयात ध्वजारोहण

पोलीस आयुक्तांच्या हस्ते आयुक्तलयात ध्वजारोहण

अमरावती : २६ जानेवारी प्रजासत्ताकदिनी पोलीस आयुक्तालयात पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी राष्ट्रपती पोलीस पदकप्राप्त तिघांचाही पुष्पगुच्छ देऊन गौरव तसेच कोविड योद्धांचा सन्मान तसेच जंगलात मुलीचे प्राण वाचविणाऱ्या पोलिसांचा सन्मानही पोलीस आयुक्तांनी केला.

राजापेठचे नवे ठाणेदार मनीष ठाकरे, एएसआय अशोक मांगलेकर, एएसआय पुरुषोत्तम बारड यांनी कर्तव्यकाळात गुणवत्तापूर्ण सेवादिल्याबदल त्यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले आहे. त्यामुळे पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले. त्यानंतर विभागीय क्रीडा संकुल येथे आयोजीय प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य कार्यक्रमात पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते त्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

बॉक्स:

कोविड काळात उत्कृष्ट काम करणाऱ्यांचा गौरव

कोरोना काळात उत्कृष्ट काम करणाऱ्या पोलीस अधिकारी नांदगाव पेठचे पोलीस अधिकारी अनिल कुरळकर, तसेच येथील अंमलदार, तसेच नागपुरी गेटेचे पोलीस शिपाई दत्तात्र्य ढोरे, विजय राठोड यांना पुष्पगुुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

बॉक्स:

भानखेडा जंगलात मुलीचा जीव वाचविणाऱ्यांचा गौरव

२० जानेवारी २०२१ रोजी भानखेडा येथील घनदाट जंगलात एका मुलीचा जीव वाचविण्यात आला. यासाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा गौरव पोलीस आयुक्तांनी केला. यात खोलापुरी गेटच्या पीएसआय सोनू झामरे, महिला पोलीस शिपाई भाग्यश्री परदेशी, नायब पोलीस शिपाई रवींद्र निमकर, गणेश यादव, प्रेमकुमार यादव, हरीश प्रदान, सौरभ देशमुख आदी पोलिसांचा, तर येथील जागृत नागरिक संकेत मेश्राम,पवन महल्ले, हर्षल बोरकर, आकाश वानखडे (सर्व रा. कैलाशनगर) यांनाही प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

बॉक्स:

बालगृहातील तीन मुलींचे प्राण वाचविले

बालगृहातील तीन मुलींचा शोध घेऊन त्यांचे प्राण वाचविल्याप्रकरणी महिला पोलीस शिपाई भाग्यश्री पवार, ज्योती निलगीरी (दामिनी पथक) यांचाही सन्मान करण्यात आले.

बॉक्स:

सायकलिंग राईटच्या स्पर्धकांचा गौरव

सन २०२०-२१ मध्ये वाशिम येथील क्लबने आयोजित केलेल्या २०० ते ६०० किमी सायकल राईट स्पर्धेत यशस्वी ठरलेल्या पोलीस जमादार विजय धुर्वे, नापोका गणेश बोरोकार, जमादार बाबाराम मेश्राम, लघुलेखक देवानंद भोजे यांनाही पोलीस आयुक्तांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी पोलीस उपायुक्त (मुख्यालय) विक्रम साळी, परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त शशीकांत सातव, एसीपी सोहेल शेख तसेच उतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Flag hoisting at the hands of the Commissioner of Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.