शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

वणवा संशोधनासाठी पाच विद्यापीठांकडे धुरा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 8:27 PM

राज्य शासन गंभीर : जंगलाचे सर्वेक्षण, माती तपासणी वर भर

 -गणेश वासनिक अमरावती : राज्यातील वनक्षेत्रांना गेल्या काही वर्षापासून लागत असलेल्या वणव्यामुळे राज्यशासनाने त्याची गंभीर दखल घेत यावर संशोधन करुन उपाययोजना आखण्याकरिता वनविभागाला ठोस कारणे शोधण्याचे निर्देश दिले आहे. संशोधनाकरिता राज्यातील ३ अकृषी विद्यापीठ तर दोन कृषी विद्यापीठ वणव्याचा अभ्यास करून राज्यशासनाला अहवाल देणार आहे.

राज्यात विशेषत: विदर्भातील वनक्षेत्र दरवर्षी वनांच्या आगीमुळे धुमसतेय. कोकण सारख्या वनांना सुध्दा आगी लागत असल्याने दरवर्षी अन्हाळ्यात २१००० ते ३८००० हेक्टर वनक्षेत्र जळून राख होत आहे. अमरावती जिल्ह्यात मेळघाटमध्ये दरवर्षी १००० हेक्टरच्यावर वनक्षेत्र आगी जळते.  परिणामी वनवणव्याचा मोठ्या प्रमाणात वन्यजीव, सुक्ष्म किटक, पक्षी, सरपटणारे प्राणी, गवत मौल्यवान प्रजाती नष्ट होत आहे. वनवनव्याचे आरोपी कमी प्रमाणात मिळत असल्याने दरवर्षी जंगलास आगी लावण्याच्या घटना घडत आहे. वनकायद्याचा धाक असला तरी अपुरे मनुष्यबळ, खुली संपत्ती या कारणाने जंगलास आगी लावणाºयांचे मनोबल धजावत आहे. दरवर्षी मोठ्या प्रमाणात लागणाºया आगीमुळे वनांचे हवी तशी वाढ होत नसल्याचा निष्कर्ष वनविभागाने काढलेला आहे.

शासनाची दखलराज्य शासनाने सन २०१८-१९ मध्ये वनवणवा संबंधित संशोधन व सर्व्हेक्षण करण्याबाबत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्रजळगाव विद्यापीठ, अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, राहुरी येथील कृषी विद्यापीठ यांच्याकडे संशोधनाची धुरा सोपविली आहे.अकृषी आणि कृषी विद्यापीठांचे प्राध्यापक जंगलात जाऊ न सतत ३ ते ५ वर्षे आग लागणाºया जंगलातील ठिकाणांचे सर्व्हे करून माती तपासणार आहे. या ठिकाणी लागणाºया आगीमुळे वनक्षेत्रावर त्याचा काय परिणाम झालेला आहे. याचे आकलन करून तसा अहवान वनविभागामार्फत राज्य शासनाला सादर करणार आहे.

विदर्भातील वनांचे सर्व्हेक्षणराज्यात विदर्भात चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती (मेळघाट), बुलढाणा, गचिरोली, गोंदिया, भंडारा व नागपूर जिल्ह्यातील वनक्षेत्रांना आगी लावल्या जातात. बहुतांश आगी ह्या मानव निर्मित असल्याचे पुढे आलेले आहे. परिणामी आरोपी मिळत नसल्याने वनविभाग हतबल आहे. कोट्यवधीची वनसंपदा वनात जळत आहे. यावर उपाय योजना केल्या जात असल्या तरी त्या कुचकामी ठरत आहे.

ब्लोअर मशीन पर्यायगेल्या ३ वर्षापासून वनवणवा रोखण्यासाठी वनविभागाने आग नियंत्रणाकरिता ब्लोअर मशीन उपलब्ध करून दिल्यात. मात्र, ही संख्या अपुरी आहे. प्रत्येक परिमंडळात केवळ २ ते ३ ब्लोअर मशीन आहेत. त्यांची संख्या वाढविणे आवश्यक आहे. वनवणव्याबाबत संशोधन झाल्यानंतर यात प्रगती होणार किंवा नाही हे बघणे औचित्याचे ठरले.

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ व अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ चमुने वणव्याच्या संशोधनाला सुरूवात केली आहे. तीन वर्षात हा अहवाल वन विभागाला मिळणार आहे. अमरावती प्रादेशिक स्तरावर अगोदरच सुरूवात झाली आहे.      - प्रवीण चव्हाण       मुख्य वनसंरक्षक, अमरावती.