शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटात अवघ्या सहा महिन्यांत पाच वाघांची शिकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2018 19:51 IST

एका वाघाची शिकार पाच वर्षांपूर्वी : वाघांच्या शिकारीस मुख्य वनसंरक्षकांचा दुजोरा

- अनिल कडू 

परतवाडा (अमरावती) : मेळघाटात अवघ्या सहा महिन्यांत पाच वाघांची शिकार झाली असून, या शिकारी २०१७-१८ मधील आहेत. या सर्व शिकारी पूर्व मेळघाट वनविभागांतर्गत बफर क्षेत्रात घडल्या आहेत, तर एका वाघाची शिकार मेळघाट व्याघ्र प्रकल्प क्षेत्रांतर्गत कोअर क्षेत्रात २०१३ मध्ये घडली आहे. व्याघ्र प्रकल्पांतर्गत २०१३ मध्ये घडलेल्या शिकारीसंदर्भात काही पुरावे अधिकाऱ्यांच्या हाती लागले आहेत. हाती आलेले जैविक नमुने प्रयोगशाळेकडे पाठविले आहेत. या वाघांच्या शिकारीस मुख्य वनसंरक्षकांनीही दुजोरा दिला आहे.

पूर्व मेळघाट वनविभागांतर्गत अंजनगांव वनपरिक्षेत्रातील खोंगड गावाच्या शेतीच्या बाजूला पहिला वाघ २०१७ च्या दिवाळीत, दुसरा वाघ २०१७ च्या हिवाळ्यात लाल मामा मंदिराजवळ, तिसरा वाघ २०१८ च्या होळीला गिरगुटीजवळ रक्षा नालानजीक, चौथा वाघ दहा महिन्यांअगोदर सचिन बेलसरे यांच्या शेताजवळ शिकाऱ्यांनी मारला. पाचवा वाघ  (बिबट) २०१८ मधील होळीच्या एक महिन्याआधी शंकर जामुनकर यांच्या शेतात मारण्यात आला. आरोपी संजय उर्फ बंसीलाल हिरालाल जामुनकर (रा. गिरगुटी) यांचे जबाबावरुन चौकशी अधिकाऱ्यांना ही माहिती मिळाली. पूर्व मेळघाट वनविभागाचे सहायक वनसंरक्षक अशोक पऱ्हाड यांच्यासमोर हे जबाब नोंदविले गेले आहेत. 

दरम्यान, मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत सन २०१३ मध्ये झालेल्या वाघाच्या शिकारीच्या अनुषंगाने चौकशी सुरु आहे. यात वनखंड ८६० मध्ये मुसळीची तस्करी आणि सायाळची शिकार ८ ऑगस्ट २०१८ ला घडली आहे. यात गिरगुटी येथील ३२ आरोपी आहेत. वनखंड ९४६ मध्ये १८ सप्टेंबर २०१८ ला सांबराची शिकार झाली. त्यात १३ आरोपी आहेत. वनखंड ९४५ मध्ये चांदी अस्वल आणि सायाळची शिकार २० सप्टेंबर २०१८ ला झाली आहेत. यात १२ आरोपी असून, या तिन्ही गुन्ह्यांत सानू तानू दारसिम्बे (रा. गिरगुटी) हा मुख्य आरोपी आहे. हे सर्व वनखंड मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या चिखलदरा वनपरिक्षेत्रातील आहेत. यात चिखलदरा वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी प्रथम गुन्हा रिपोर्ट दाखल केला आहे. 

पुरावे अद्याप दूरच!पूर्व मेळघाट वनविभागांतर्गत सहा महिन्यात घडलेल्या पाच वाघांच्या हत्येसंदर्भात शिकार झालेले ठिकाण, अवयव व शिकारीसाठी वापरलेले हत्यार आदी पुरावे चौकशी अधिकाऱ्यांच्या हाती लागलेले नाहीत.

टॅग्स :Tigerवाघforest departmentवनविभाग