देहविक्रय करणाऱ्या पाच तरूणींना अटक
By Admin | Updated: February 25, 2016 00:05 IST2016-02-25T00:05:50+5:302016-02-25T00:05:50+5:30
देहविक्री व्यवसायातील पाच तरुणींसह एक एजन्ट महिला व एका युवकास पोलिसांनी बुधवारी सायंकाळी अटक केली.

देहविक्रय करणाऱ्या पाच तरूणींना अटक
महिला एजंटसह युवकही ताब्यात : आनंदवाडी कॉलनीतील रहिवासी संकुलातील घटना
अमरावती : देहविक्री व्यवसायातील पाच तरुणींसह एक एजन्ट महिला व एका युवकास पोलिसांनी बुधवारी सायंकाळी अटक केली. कठोरा नाका परिसरातील आनंदवाडी कॉलनीतील एका फ्लॅट सिस्टीममध्ये हा व्यवसाय सुरु होता.
दोन एजन्ट महिलांनी एक महिन्यापूर्वी आनंदवाडी कॉलनीत एका तीन मजली फ्लॅट सिस्टीमध्ये फ्लॅट भाडेतत्वावर घेतला. तेथे पाच तरुणींमार्फत देहविक्रीचा व्यवसाय सुरु केला. हा प्रकार काही दिवसांपूर्वी परिसरातील नागरिकांच्या लक्षात आला होता. देहविक्री होत असल्याची माहिती पोलीस विभागाला दोन दिवसांपूर्वीच मिळाल्याने पोलिसांनी आनंदवाडी परिसरातील त्या फ्लॅटवर लक्ष केंद्रीत केले. देहविक्री होत असल्याची शहानिशा झाल्यानंतर बुधवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास एका पंटरला ग्राहक बनवून फ्लॅटमध्ये पाठविले.
एकाने फ्लॅटच्या गॅलरीतून टाकली उडी
गुप्त माहितीवरून पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांच्या नेतृत्वात गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पाटील, महिला सेलच्या पोलीस निरीक्षक नीलिमा आरज, एपीआय संजीवनी थोरात, दोन महिला पोलीस, पोलीस शिपाई वाटाणे, नरवणे, दीपक खानीवाले, अक्षय देशमुख, अमोल आदींनी आनंदवाडी कॉलनीतील फ्लॅटमध्ये धाड टाकली. यावेळी तेथील फ्लॅटमध्ये उपस्थित असणारा आरोपी अतुल इंगळेने पसार होण्यासाठी गॅलरीतून बाहेर उडी मारली. मात्र, फ्लॅटखाली उभे असणाऱ्या पोलिसांनी इंगळेला पकडले. त्याचप्रमाणे पाच तरुणींपैकी दोघींनीसुध्दा गॅलरीतून उडी टाकण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, महिला पोलीस शिपायांनी त्यांना पकडले.
‘त्या’ तरुणी विविध शहर-राज्यातील
दोन एजन्ट महिला पाच तरुणींकडून देहविक्रीचा व्यवसाय करून घेत होत्या. चंद्रपूर, गुजरात, धामणगाव व दोन मुली अमरावतीमधील असल्याची कबुली त्या तरुणींनी पोलिसांना दिली.