हव्याप्र मंडळातील राड्यात पाच विद्यार्थ्यांना अटक
By Admin | Updated: December 15, 2014 22:48 IST2014-12-15T22:48:14+5:302014-12-15T22:48:14+5:30
हनुमान व्यायाम प्रसारक मडंळात झालेल्या विद्यार्थ्यांच्या दगंलीत शनिवारी एका आरोपीला अटक करण्यात आली होती. रविवारी सायंकाळी पुन्हा चार आरोपींना राजापेठ पोलिसांनी अटक केली आहे.

हव्याप्र मंडळातील राड्यात पाच विद्यार्थ्यांना अटक
अमरावती : हनुमान व्यायाम प्रसारक मडंळात झालेल्या विद्यार्थ्यांच्या दगंलीत शनिवारी एका आरोपीला अटक करण्यात आली होती. रविवारी सायंकाळी पुन्हा चार आरोपींना राजापेठ पोलिसांनी अटक केली आहे. भजनलाल किसन शर्मा (२४, रा. दिल्ली) यांच्यासह अन्य चार विद्यार्थ्यांना न्यायालयाने १८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून अन्य आरोपींना सुध्दा पोलीस कोठडी मिळाली आहे.
लोकेश रविंद्रकुमार गोयल(१९, रा. ओशीकला, मथुरा), गौरवकुमार पवनकुमार (२०, रा. सामदी, युपी), निखिलकुमार अशोककुमार (१९,रा. नोएडा, युपी) आणि किशन योगेंद्र अरोरा (२१, रोहिनी, दिल्ली) असे अटक विद्यार्थ्यांची नावे आहेत.
आंतराष्ट्रीय ख्याती प्राप्त हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात शनिवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास दिल्ली-सिक्कीमच्या विद्यार्थ्यांमध्ये राडा झाला. यावेळी हाणामारीत तब्बल १५ विद्यार्थ्यांसह पद्मश्री ताऊजी ऊर्फ प्रभाकरराव वैद्य जखमी झाले.
या मारहाणीत पिंम्पा थेरसिंग (२३), सुभालाल राई गोविंदसिंग (२२), शिशिर चैत्री (२१), प्रमेश राजू चैत्री (२३), लाखो राय सिरीन (२१) सर्व राहणार सिक्कीम, मयूर अनिल कुमार (२२, रा. एसपी रोड, दिल्ली) जखमी झाले होते.