पाच पॉझिटिव्ह, एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 05:01 IST2020-05-23T05:00:00+5:302020-05-23T05:01:02+5:30

कोविड रुग्णालयात १५ मेपासून दाखल असलेल्या पाटीपुरा येथील ३० वर्षीय युवकाचा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याचा कोरोना चाचणी अहवाल १६ मे रोजी पॉझिटिव्ह आला होता. पाच-सहा दिवसांपासून त्याची प्रकृती चिंताजनक होती. त्याला व्हेंटिलटरवर ठेवण्यात आले होते. शुक्रवारी पहाटे त्याची प्राणज्योत मालवली.

Five positive, one dead | पाच पॉझिटिव्ह, एकाचा मृत्यू

पाच पॉझिटिव्ह, एकाचा मृत्यू

ठळक मुद्देमृतावर सुरू होता उपचार : एकूण कोरोनाग्रस्त १४५, मृत १४

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : येथील कोविड रुग्णालयात उपचार घेणाऱ्या पाटीपुरा येथील एका ३० वर्षीय युवकाचा शुक्रवारी पहाटे मृत्यू झाला. मृत्यूशी त्याची झुंज आठ दिवसांनी संपली. दिवसभरात पाच कोरोना पॉझिटिव्ह निष्पन्न झाले आहेत.
मसानगंज येथील ५० वर्षीय महिला, लालखडी येथील एक १९ वर्षीय युवक, शिवनगर येथील २३ वर्षीय पुरुष, इतवारा बाजार येथील २९ वर्षीय युवक व भातकुलीतील ५० वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या १४४ वर होती. त्यात इंदूर येथे पॉझिटिव्ह आढळलेल्या सात वर्षीय बालकाचा समावेश झाल्याने कोरोनाग्रस्तांची संख्या १४५ झाली आहे. भातकुलीतील कोरोनाग्रस्त हा १७ मे रोजी इर्विनमध्ये दगावलेल्या ४७ वर्षीय दूधविक्रेत्याच्या कुटुंबातील सदस्य आहे.
कोविड रुग्णालयात १५ मेपासून दाखल असलेल्या पाटीपुरा येथील ३० वर्षीय युवकाचा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याचा कोरोना चाचणी अहवाल १६ मे रोजी पॉझिटिव्ह आला होता. पाच-सहा दिवसांपासून त्याची प्रकृती चिंताजनक होती. त्याला व्हेंटिलटरवर ठेवण्यात आले होते. शुक्रवारी पहाटे त्याची प्राणज्योत मालवली. त्याच्यासह जिल्ह्यात कोरोनाने मृतांची संख्या १४ झालेली आहे. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील लोहगाव येथील एक कुटुंब इंदूर येथून परतले. त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. या कुटुंबातील एका सात वर्षीय मुलाच्या थ्रोट स्वॅब नमुन्यांचा अहवाल इंदूर येथून पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे या सात वर्षीय मुलास कोविड रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांचा संपर्कातील इतर नऊ जणांचे संस्थात्मक विलगीकरण केले असून, थ्रोट स्वॅब घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
 

Web Title: Five positive, one dead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.