दिल्ली कार्यक्रमावरून जिल्ह्यात परतल्या १८ व्यक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2020 05:00 AM2020-04-02T05:00:00+5:302020-04-02T05:00:46+5:30

दिल्ली येथे ८ ते १० मार्च या कालावधीत तबलिगी जमातचा धार्मिक मेळावा निजामुद्दीन परिसरातील बंगलेवाली मशिदीत घेण्यात आला. या मेळाव्यात इंडोनेशिया, मलेशियासह अनेक देशांतील अडीच हजारांवर नागरिक सहभागी झाले होते. या समूहातील २४ जणांना कोविड-१९ ची बाधा झाल्याचे आतापर्यंत स्पष्ट झाले. त्यापैकी आठ व्यक्तींचा या आजाराने मृत्यू झालेला आहे.

Five persons returned to the district from Delhi program | दिल्ली कार्यक्रमावरून जिल्ह्यात परतल्या १८ व्यक्ती

दिल्ली कार्यक्रमावरून जिल्ह्यात परतल्या १८ व्यक्ती

googlenewsNext
ठळक मुद्देसर्वांचे थ्रोट स्वॅब तपासणीला : वलगाव येथील कक्षात सर्व १४ दिवस क्वारंटाइन

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : दिल्ली येथील धार्मिक मेळाव्यात सहभागी झालेल्या शहरातील १५ व ग्रामीण भागातील तीन व्यक्ती जिल्ह्यात आल्याची माहिती प्रशासनाला मिळताच, या सर्वांना बुधवारी ताब्यात घेण्यात आले व त्यांची पथकाद्वारे आरोग्य तपासणी करण्यात आली. या सर्व व्यक्तींना वलगाव येथील संत गाडगे महाराज वृद्धाश्रमातील कक्षात १४ दिवसांकरिता क्वारंटाइन करण्यात आल्याची माहिती आहे.
दिल्ली येथे ८ ते १० मार्च या कालावधीत तबलिगी जमातचा धार्मिक मेळावा निजामुद्दीन परिसरातील बंगलेवाली मशिदीत घेण्यात आला. या मेळाव्यात इंडोनेशिया, मलेशियासह अनेक देशांतील अडीच हजारांवर नागरिक सहभागी झाले होते. या समूहातील २४ जणांना कोविड-१९ ची बाधा झाल्याचे आतापर्यंत स्पष्ट झाले. त्यापैकी आठ व्यक्तींचा या आजाराने मृत्यू झालेला आहे. या पार्श्वभूमीवर सदर कार्यक्रमात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहभागी झालेल्या नागरिकांचा शोध प्रशासनाद्वारे घेण्यात आला. या अनुषंगाने दिल्लीे परिसरातील १८ नागरिक अमरावती जिल्ह्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला मिळाली. शहरातील या नागरिकांचा गाडगेनगर ठाण्याच्या पोलीस पथकाने गुरुवारी शोध घेतला. त्यांना ते आढळून आले. महापालिकेच्या आरोग्य पथकाने या सर्व नागरिकांची प्राथमिक आरोग्य तपासणी केली व सर्वांना जिल्हा सामान्य रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी आणण्यात आले. या ठिकाणी त्यांचे थ्रोट स्वॅब घेण्यात आल्यानंतर त्यांना वलगाव येथील क्वारंटाइन कक्षात ठेवण्यात आल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. या सर्व व्यक्ती दिल्ली येथील सिलमपूर येथील आहेत व २४ फेब्रुवारीला त्यांनी अमरावतीला गाठल्याचे सांगितले, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

आणखी १० व्यक्तींचा शोघ
मिळालेल्या माहितीनुसार, शहरासह जिल्ह्यात आणखी १० व्यक्ती दिल्लीवरुन यापूर्वीच आल्या असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला मिळाली आहे. आता या सर्वांचा शोध पोलिसांसह आरोग्य पथक घेत आहे. या नागरिकांचा दिल्ली येथील कार्यक्रमात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष सहभाग असल्याने त्यांचीही वैद्यकीय तपासणी आता होणार आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी १८ व्यक्ती जिल्ह्यात आल्याची माहिती दिली.

Web Title: Five persons returned to the district from Delhi program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.