बच्चू कडूंसह पाच जणांना अटकपूर्व जामीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 22:45 IST2018-02-28T22:45:19+5:302018-02-28T22:45:19+5:30
अचलपूरचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्यासह पाच जणांना बुधवारी अचलपूर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.ए. सईद यांच्या न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला.

बच्चू कडूंसह पाच जणांना अटकपूर्व जामीन
आॅनलाईन लोकमत
परतवाडा : अचलपूरचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्यासह पाच जणांना बुधवारी अचलपूर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.ए. सईद यांच्या न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला.
आ. बच्चू कडू आणि त्यांच्या चार सहकाऱ्यांविरोधात चांदूर बाजार येथील नगरसेवक गोपाल तिरमारे यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावर आ. कडू यांना १५ फेब्रुवारी रोजी याच प्रकरणात अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर बुधवारी पाचही जणांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला.
आ. बच्चू कडू, विशाल बंड, गोलू ठाकरे, सागर मोहोड, सनी सवळे यांनी चांदूरबाजार येथील गोपाल तिरमारे यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप झाल्याने त्याचेविरुद्ध भादंविचे कलम ३०७ अन्वये गुन्हा नोंद केला होता. बुधवारी अचलपूर जिल्हा व सत्र न्यायालयाने त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला. बच्चू कडू आणि सहकाऱ्यांच्यावतीने महेश देशमुख आणि नीलेश धोपे यांनी यु्क्तिवाद केला. सदर घटनेची सुनवाणी २८ फेब्रुवारीला अचलपूर अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश एस.ए. सईद यांनी जामीन दिला.