जेवणातून पाच जणांना विषबाधा

By Admin | Updated: April 9, 2015 00:12 IST2015-04-09T00:12:37+5:302015-04-09T00:12:37+5:30

रात्रीचे जेवण सकाळी खाल्ल्याने पाच जणांना विषबाधा झाल्याची घटना तिवस्यात बुधवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

Five people have poisoned food | जेवणातून पाच जणांना विषबाधा

जेवणातून पाच जणांना विषबाधा

तिवस्यातील घटना : दोन गंभीर, रात्रीची भाजी महागात पडली
अमरावती : रात्रीचे जेवण सकाळी खाल्ल्याने पाच जणांना विषबाधा झाल्याची घटना तिवस्यात बुधवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. पाचही जणांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.
गोपाल हिवे (५५), विशाल हिवे (२२), अक्षय वानखडे (२५), शाम वानखडे (२७) व रुपेश खैरकर यांनी मंगळवारी रात्री तिवस्यातील एक शेतशिवारात अंडाकरीची पार्टी केली. त्यांनी रात्रीचे जेवण केल्यानंतरही काही भाजी शिल्लक होती. त्यामुळे त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा जेवण करण्याचा बेत आखला होता. त्यानुसार बुधवारी सकाळी ११ ते १२ वाजच्या सुमारास पाचही जणांनी जेवण केले.

Web Title: Five people have poisoned food