चीनमधून पाच जणांचे आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 05:00 IST2020-02-09T05:00:00+5:302020-02-09T05:00:32+5:30

एका युवकाच्या लक्षणांवरून वैद्यकीय अधिकाऱ्यांचा संशय बळावल्यामुळे त्याचा 'थ्रोट स्वॅब' (घशातील द्रवाचा नमुना) पुण्यातील 'नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी' (एनआयव्ही) अर्थात राष्ट्रीय विषाणुविज्ञान संस्थेला तपासणीसाठी पाठविण्यात आला; तथापि त्यासंबंधीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. अचलपूर तालुक्यातील 'तो' युवक वैद्यकीय निरीक्षणात आहे.

Five people arrive from China | चीनमधून पाच जणांचे आगमन

चीनमधून पाच जणांचे आगमन

ठळक मुद्देदोघे निरीक्षणात। एकावर संक्रमणाचा संशय, 'कोरोना निगेटिव्ह'च्या अहवालाने मात्र जीव भांड्यात

इंदल चव्हाण।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोरोनाची दहशत पसरल्यानंतर चीनमधून अमरावती जिल्ह्यात आतापर्यंत पाच जणांचे आगमन झाले आहे. त्यातील दोन विद्यार्थी अद्यापही वैद्यकीय निरीक्षणात आहेत. एका युवकाच्या लक्षणांवरून वैद्यकीय अधिकाऱ्यांचा संशय बळावल्यामुळे त्याचा 'थ्रोट स्वॅब' (घशातील द्रवाचा नमुना) पुण्यातील 'नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी' (एनआयव्ही) अर्थात राष्ट्रीय विषाणुविज्ञान संस्थेला तपासणीसाठी पाठविण्यात आला; तथापि त्यासंबंधीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. अचलपूर तालुक्यातील 'तो' युवक वैद्यकीय निरीक्षणात आहे.
चीनमधून भारतात परतणाऱ्यांची माहिती संबंधित जिल्ह्याच्या नोडल आॅफिसरला आरोग्य विभागाकडून देण्यात आलेली आहे. ७ जानेवारी रोजी जिल्ह्यात आलेल्या तिघांना महिना उलटला. त्यांच्याबाबत प्रशासन आता निश्चिंत आहे. २९ जानेवारी रोजी आलेल्या दोघांना १० दिवस झालेले आहेत. १४ दिवसांपर्यंत त्यांची दररोज तपासणी केली जात आहे. विशेष वैद्यकीय चमू त्यासाठी कार्यरत असल्याची माहिती निवासी वैद्यकीय अधिकारी प्रशांत घोडाम यांनी 'लोकमत'ला दिली. २९ जानेवारी रोजी आलेल्या दोघांमध्ये एक वरूडचा, तर दुसरा अचलपूर तालुक्यातील विद्यार्थी आहे. २१ वर्षांचे हे तरुण चीनमधील झेजियांग प्रांतात वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. २९ जानेवारी ते ७ फेब्रुवारी दरम्यानचा रोजचा वैद्यकीय तपासणी अहवाल शासनाला सादर करण्यात आला आहे. पुढील सूचनेपर्यंत ही दैनंदिन तपासणी सुरूच राहील.
अचलपूर तालुक्यातील विद्यार्थ्याचा अहवाल पुण्याच्या संस्थेने २४ तासांत अमरावतीच्या डॉक्टरांना दिला. त्यात ‘कोरोना व्हायरस निगेटिव्ह’ असा उल्लेख आहे. १४ दिवस होईपर्यंत हा युवक डॉक्टरांच्या निरीक्षणात असेल.

चीनमधून आलेल्या भारतीय विद्यार्थ्यांपैकी एक संक्रमण संशयित असल्याने त्याचे 'थ्रोट स्वॅब' पुणे येथील एनआयव्हीमध्ये तपासणीकरिता पाठविले होते. ते निगेटिव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. १४ दिवस पूर्ण होईपर्यंत त्या युवकावर आमची बारीक नजर आहे.
- श्यामसुंदर निकम
जिल्हा शल्यचिकित्सक, अमरावती

Web Title: Five people arrive from China

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.