जफरसह पाच जणांना अटक
By Admin | Updated: January 14, 2015 22:59 IST2015-01-14T22:59:29+5:302015-01-14T22:59:29+5:30
चांदणी चौक गोळीबार प्रकरणातील मुख्य सुत्रधार उपमहापौर शेख जफर शेख जब्बार यांच्यासह पाच आरोपींना गुरुवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.

जफरसह पाच जणांना अटक
गोळीबार प्रकरण : पाचही जणांना सहा दिवसांची कोठडी
अमरावती : चांदणी चौक गोळीबार प्रकरणातील मुख्य सुत्रधार उपमहापौर शेख जफर शेख जब्बार यांच्यासह पाच आरोपींना गुरुवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. पाचही आरोपींना न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अहमद खा रहमत खा, शारीक परवेज शकील अहमद, अब्दुल राजीक अब्दुल रशीद व शेख अतिक शेख रफीक असे, अटकेतील आरोपींची नावे आहे.
चांदणी चौकात झालेल्या गोळीबार नागपुरी गेट पोलीसांनी पहिल्यादा चार आरोपींना अटक केली होती. त्यानंतर ते प्रकरण गुन्हे शाखेकडे देण्यात आले होते. गुन्हे शाखेच्या पथकाने कसुन चौकशी करुन ११ आरोपींना अटक केली. चांदणी चौकात गोळीबारी घटनेनंतर पोलिसांनी शेख नईम शेख रहेमत(२१, रा. अलिम नगर), अब्दुल मजीद अब्दुल रशीद(२३, रा. आसिर कॉलनी), आरिफ अली अशरफ अली(४२,रा. फरीद नगर), अन्वर हुसेन मोहम्मद हुसेन(३५,रा. पॅराडाईज कॉलनी), सैयद आरिफ उर्फ लेंडया सै. साबिर(३८,रा. गुलिस्ता नगर), रामुसिंग उर्फ शक्ती बिदेश्वरसिंग(२४,रा. नंदनवन कॉलनी), मोहम्मद इम्रान वल्द अब्दुल सत्तार(२२, रा. लालखडी), अब्दुल सारीक शेखर रज्जाक (२७,रा. हाथीपुरा), अब्दुल हफिज अब्दुल अजिज(३३,रा. आसिर कॉलनी), अजय भगंवत पाटील(२१, रा. आमले प्लॉट) व मोहम्मद अझर अब्दुल कदीर(२३,रा. गुलिस्ता नगर) या १४ आरोपींना अटक केली होती.