पाच रुग्णांचा मृत्यू, ३२५ कोरोना संक्रमित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:13 IST2021-04-04T04:13:56+5:302021-04-04T04:13:56+5:30
अमरावती : जिल्ह्यात कोरोना संक्रमितांची संख्या कमी होण्याचे नाव घेत नाही. आरोग्य यंत्रणेच्या अहवालानुसार शनिवारी पाच रुग्णांचा कोरोनाने बळी ...

पाच रुग्णांचा मृत्यू, ३२५ कोरोना संक्रमित
अमरावती : जिल्ह्यात कोरोना संक्रमितांची संख्या कमी होण्याचे नाव घेत नाही. आरोग्य यंत्रणेच्या अहवालानुसार शनिवारी पाच रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला असून, ३२५ संक्रमित आढळून आले आहे.
चांदूर रेल्वे येथील ४२ वर्षीय पुरुष, वरूड येथील ५३ वर्षीय पुरुष व ८१ वर्षीय महिला, वर्धा आर्वी येथील ७८ वर्षीय पुरुष, तिवसा भारवाडी येथील ४० वर्षीय पुरुषाचा उपचारादम्यान मृत्यू झाला आहे. मयतांची संख्या ६८६ वर पोहोचली आहे. ३२५ संक्रमित आढळून आले असताना रुग्णसंख्येचा आकडा ४९ हजार ५२३ वर पोहोचला आहे. शनिवारी उपचारासाठी ८०० रुग्ण दाखल असून, १७८ जणांनी कोरोनावर मात करून घरी बरे होऊन परतले आहे. गृहविलगीकरणात महापालिका क्षेत्रात ८७८, तर ग्रामीण भागात १६१५ रुग्ण आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण ३२९३ एवढे आहेत. रिकव्हरी रेट ९१.९७ टक्के, डबलिंग रेट ५३, डेथ रेट १.३९ टक्के एवढा आहे. आतापर्यंत ३ लाख २९ हजार ३०४ नमुने तपासणी झालेली आहे.