कारागृहात पाच नवीन कैदी संक्रमित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:37 IST2021-01-08T04:37:26+5:302021-01-08T04:37:26+5:30
अमरावती : येथील मध्यवर्ती कारागृहात पाच नवीन कैदी संक्रमित आढळून आले आहेत. हे पाचही कैदी सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचारार्थ ...

कारागृहात पाच नवीन कैदी संक्रमित
अमरावती : येथील मध्यवर्ती कारागृहात पाच नवीन कैदी संक्रमित आढळून आले आहेत. हे पाचही कैदी सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचारार्थ दाखल आहेत. नवीन कैद्यांचा अंध विद्यालयातील तात्पुरत्या कारागृहात १५ दिवस मुक्काम असतो. या पाचही कैद्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.
कोरोनाचा नवा स्ट्रेन येणार असल्याच्या धास्तीने आरोग्य प्रशासनाने सावधगिरी बाळगली आहे. त्याअनुषंगाने शासनाने ३१ जानेवारीपर्यंत लॉकडाऊनचे निर्बंध कायम ठेवले आहे. असे असले तरी कारागृहात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या स्थिरावली आहे. सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात कारागृहात कोरोना संक्रमितांची संख्या ४५ च्या वर पोहोचली होती. मात्र, नोव्हेंबरपासून कैद्यांमध्ये संक्रमण कमी आढळून येत आहे. कारागृहात कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेऊन स्थानिक होमगार्ड कार्यालयात अलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आले होते. परंतु, अलगीकरण कक्षत एकही संक्रमित कैदी नसल्याने ते बंद करण्यात आले असून, येथील २४ तास कर्तव्यावरील वैद्यकीय यंत्रणा गुंडाळण्यात आली आहे.
------------------------------
सर्दी, खोकला, तापाची नियमित तपासणी
कारागृहात बंदीस्त कैद्यांची नियमित सर्दी, खोकला व तापाचे लक्षणे असलेल्या कैदयांची नियमित तपासणी केली जाते. प्रसंगी लक्षणे जास्त दिसून आल्यास सदर कैद्याची ॲन्टीजेन चाचणी केली जाते. यात काही सुधारणा दिसून न आल्यास पुन्हा आरटीपीसीआर चाचणी करण्यासाठी पाठविले जाते. तूर्त कारागृहात कोरोना नियंत्रणात असल्याची माहिती कारागृहाचे वैदयकीय अधिकारी एफ.आय. थोरात यांनी दिली.