पालकमंत्र्यांचे दुष्काळी निधीसाठी पाच लाख
By Admin | Updated: September 18, 2015 00:13 IST2015-09-18T00:13:31+5:302015-09-18T00:13:31+5:30
राज्यातील मराठवाडा व अन्य परिसरात पुरेसा पाऊस न पडल्याने दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून ....

पालकमंत्र्यांचे दुष्काळी निधीसाठी पाच लाख
अमरावती : राज्यातील मराठवाडा व अन्य परिसरात पुरेसा पाऊस न पडल्याने दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून दुष्काळग्रस्तांना मदत म्हणून पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी ५ लाखांचा धनादेश सहाय्यता निधीसाठी मुख्यमंत्र्यांना मंगळवारी सुपूर्द केला.
शेतकरी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत असल्यामुळे अशा कुटुंबांची हालअपेष्टा होऊ नये व त्यांना शासनाकडून मदत मिळावी यासाठी राज्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी सहाय्यता निधीला मदत केली आहे. (प्रतिनिधी)