पाच लाखांचा गांजा जप्त

By Admin | Updated: August 27, 2015 00:26 IST2015-08-27T00:26:02+5:302015-08-27T00:26:02+5:30

बडनेऱ्याच्या बसडेपो परिसरात गुन्हे शाखेने धाड टाकून ५ लाख १४ हजार रुपयांचा ५१ किलो गांजा पकडला आहे.

Five lakhs of ganja seized | पाच लाखांचा गांजा जप्त

पाच लाखांचा गांजा जप्त

एसटीने झाली आवक : गुन्हे शाखेची कारवाई
बडनेरा : बडनेऱ्याच्या बसडेपो परिसरात गुन्हे शाखेने धाड टाकून ५ लाख १४ हजार रुपयांचा ५१ किलो गांजा पकडला आहे. हा गांजा अंबेजोगाई ते अमरावती बसने आला होता. ही कारवाई मंगळवार २५ रोजी उशिरा रात्री करण्यात आली. याप्रकरणी एनडीपीएस अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अब्दुल कलाम ऊर्फ कल्लू शेख रोजवान (५२, रा. पोर्टल चाळ बडनेरा) सय्यद नासीर अली शेख अली (५०), सय्यद मेहमुद सय्यद रहमान (६६), अम्मू शहा रहमतुल्ला शहा (३६, सर्व राहणार अमरावती) अशी आरोपींची नावे आहेत. गुन्हे शाखेने गुप्त माहितीच्या आधारे बसस्थानक परिसरात २५ आॅगस्ट रोजी रात्री ९ वाजता धाड टाकून चार जणांना गांज्यासह ताब्यात घेतले. हे चारही जण अंबेजोगाई ते अमरावती येथून बसले. त्यांनी हा गांजा विशाखापट्टणम् येथून आणल्याची माहिती गुन्हे शाखेने दिली. गांजा प्लॉस्टिकच्या पोत्यात होता. गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक गोपाल उपाध्ये यांच्या फिर्यादीवरुन एनडीपीएस अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत पोलीस निरीक्षक आत्राम, दीपक दुबे, सुभाष पाटील आदी सहभागी होते.

Web Title: Five lakhs of ganja seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.