अप्परवर्धा प्रकल्पाची पाच दारे उघडली
By Admin | Updated: August 12, 2015 00:09 IST2015-08-12T00:09:10+5:302015-08-12T00:09:10+5:30
अमरावती जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प असणाऱ्या अप्परवर्धाची पाच दारे मंगळवारी सायंकाळी उघडण्यात आल्याने ..

अप्परवर्धा प्रकल्पाची पाच दारे उघडली
मोर्शी : अमरावती जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प असणाऱ्या अप्परवर्धाची पाच दारे मंगळवारी सायंकाळी उघडण्यात आल्याने चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ व अमरावती जिल्ह्यातील नदीकाठावर वसलेल्या गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.
अप्परवर्धा प्रकल्पाची पाच दारे २५ सेंटीमिटर एवढी उघडण्यात आली आहे. धरणातून २०० घनमीटर प्रतीसेकंदप्रमाणे पाण्याचा विसर्ग सुरु आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात बरसत असलेल्या पावसामुळे धरणात झपाट्याने पाणी येणे सुरु आहे. अप्परवर्धाची सध्याची जलपातळी ३४१.९९ मीटर एवढी असून आॅगस्ट महिन्यात ३४२.२ मीटर जलपातळी ठेवण्याचे प्रकल्प विभागाचे निर्देश आहेत.
मंगळवारी सायंकाळी धरणाची पाच दारे उघडण्यात आल्याने प्रकल्प विभागाने वर्धा, यवतमाळ, अमरावती व चंद्रपुर जिल्ह्यातील नदी-नाल्या काठी असणाऱ्या गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. आणखी रात्रभर पाऊस बरसल्यास धरणाची आणखी दारे उघडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. (तालुका प्रतिनिधी)