कोरोनाचे पाच मृत्यू, ३६५ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:14 IST2021-03-23T04:14:47+5:302021-03-23T04:14:47+5:30
अमरावती : जिल्ह्यात सोमवारी पाच रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने संक्रमितांचे मृत्यूची संख्या ६३५ झालेली आहे. सोमवारी ३६५ अहवाल पॉझिटिव्ह ...

कोरोनाचे पाच मृत्यू, ३६५ पॉझिटिव्ह
अमरावती : जिल्ह्यात सोमवारी पाच रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने संक्रमितांचे मृत्यूची संख्या ६३५ झालेली आहे. सोमवारी ३६५ अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत. जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ४५,७६० झाली आहे.
जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, अंजनगाव सुर्जी येथील ६७ वर्षीय महिला, शिववाडी, तिवसा येथील ५५ वर्षीय पुरुष, शहापूर, वरूड येथील ३४ वर्षीय महिला, नांदगाव, वरूड येथील ८३ वर्षीय पुरुष, अमरावती येथील २८ वर्षीय पुरुष यांचा जिल्हा कोविड रुग्णालय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
सोमवारी जिल्ह्यात ३,६५३ नमुन्यांची तपासणी झाली. यात ९.९९ अशी पॉझिटिव्हिटी नोंदविली आहे. राज्य सेवा पूर्व परीक्षेच्या अनुषंगाने प्रक्रियेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यामुळे दोन दिवस पाच हजारांवर नमुन्यांची तपासणी झाली. याशिवाय रविवार असल्यानेही काही केंद्र बंद असल्याचेही सांगण्यात आले.