शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठ उन्हाळी परीक्षांच्या अर्जास पाच दिवसांची मुदतवाढ; आता १८ मार्चपर्यंत भरता येणार

By गणेश वासनिक | Updated: March 16, 2023 17:30 IST

माजी, नियमित विद्यार्थ्यांंना संधी; शनिवार अखेरची डेडलाईन निश्चित, यापुढे अर्जास मुदतवाढ मिळणार नाही

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावतीविद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांचे आवेदन पत्र स्वीकारण्यास आता पाच दिवसांची मुदतवाढ मिळाली आहे. यापूर्वी ३ ते १३ मार्चपर्यंत परीक्षा आवेदनपत्र स्वीकारण्याची तारीख ठरविण्यात आली हाेती. मात्र, यात बदल करुन आता शनिवार, १८ मार्चपर्यंत विद्यार्थ्यांचे परीक्षा आवेदन पत्र स्वीकारण्याचा निर्णय परीक्षा विभागाने घेतला आहे. परीक्षा आवेदनपत्र न भरणाऱ्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

विद्यापीठाच्या उन्हाळी २०२३ माजी विद्यार्थ्यांच्या परीक्षा १० एप्रिलपासून प्रारंभ होत आहे. तर नियमित प्रवेशित विद्यार्थ्यांच्या परीक्षा ११ मेपासून सुरूवात होत आहे. आतापर्यंत २ लाख ३२७ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज सादर केले आहे. विद्यापीठ अंतर्गत अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिक व बुलढाणा या पाचही जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या ६०० परीक्षा आणि १८० केंद्रावर नियोजन करण्यात येत आहे. परीक्षा फॉर्मसाठी ऑनलाईन लिंक उपलब्ध करण्यात आली आहे. सीबीसीएस पॅटर्ननुसार सर्व शाखांच्या अभ्यासक्रमाच्या परीक्षा घेण्यात येणार आहे. माजी विद्यार्थी १० एप्रिल ते ३ मे या कालावधीत, तर नियमित विद्यार्थ्यांच्या परीक्षा ११ ते ३१ मे या दरम्यान घेण्यात येणार आहे. विद्यापीठ अधिनस्थ १८० महाविद्यालयात परीक्षा केंद्र असणार आहे. उन्हाळी परीक्षांसाठी साडेतीन लाखांच्यावर विद्यार्थी परीक्षा देतील, असे नियोजन विद्यापीठाने केले आहे.

महाविद्यालयाकडून असे तारखेनुसार स्वीकारले जातील परीक्षा अर्ज

विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षा आवेदनपत्र सादर केल्यानंतर त्याची हार्ड कॉपी संबंधित महाविद्यालयांना शुल्कासह द्यावी लागणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांचे परीक्षा आवेदन पत्र शुल्हासह महाविद्यालयांना विद्यापीठात २१ ते २५ मार्च यादरम्यान जमा करावे लागणार आहे. त्याकरिता विद्यापीठात स्वतंत्र टेबलची व्यवस्था करण्यात येणार आहे. यात अमरावती जिल्हा २१ मार्च, यवतमाळ २३ मार्च, बुलढाणा जिल्हा २४ मार्च, अकोला व वाशिम जिल्हा २५ मार्च रोजी परीक्षांचे आवेदनपत्र स्वीकारले जातील, अशी माहिती परीक्षा व मू्ल्यांकन मंडळाच्या प्रभारी संचालक मोनाली तोटे-वानखडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. 

टॅग्स :Educationशिक्षणuniversityविद्यापीठexamपरीक्षाAmravatiअमरावती