वाहनात पाच गुरांचा मृत्यू
By Admin | Updated: November 17, 2016 00:13 IST2016-11-17T00:13:21+5:302016-11-17T00:13:21+5:30
शिरजगाव पोलिसांनी मंगळवारी मध्यप्रदेश- महाराष्ट्र सीमेवरील बहीरम चेक पोस्टवर पकडलेल्या ५० गुरांपैकी ५ गुरांचा मृत्यू झाला.

वाहनात पाच गुरांचा मृत्यू
गौशाळेत देखभाल : मध्यप्रदेशातून गुरांची तस्कर
परतवाडा : शिरजगाव पोलिसांनी मंगळवारी मध्यप्रदेश- महाराष्ट्र सीमेवरील बहीरम चेक पोस्टवर पकडलेल्या ५० गुरांपैकी ५ गुरांचा मृत्यू झाला. तर उर्वरित रासेगाव येथील गौशाळेत पाठविण्यात आली. बुधवारी पुन्हा याच मार्गावर कत्तलीसाठी जाणारे तीन बैल पकडण्यात आले.
परतवाडा- बैतुल मार्गावर सर्वाधिक प्रमाणात कत्तलीसाठी गुरांना ट्रकमध्ये रात्री व दिवसा भरून नेल्या जात असल्याचे आतापर्यंत उघडकीस आले आहे. मंगळवारी ट्रक क्रमांक एम.पी. ०७ जी ७२७७ मध्ये ४० गुरांना कोंबून कत्तलीसाठी नेत असताना बहीरम चेक पोस्टवर शिरजगावचे ठाणेदार मुकुंद कवाडेंसह कर्मचाऱ्यांनी पकडून कारवाई केली. आरोपी फरार झाले असून त्यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुरांना मध्यप्रदेशातून आणताना अत्यंत निर्दयीपणे कोंबून आणण्यात आले होते. बहीरम चेक पोस्टवर तपासणीदरम्यान गुरांना बाहेर काढले असता त्यातील पाच जनावरांचा गुदमरून मृत्यू झाला. तर उर्वरित ४५ गुरांना रासेगाव येथील गौरशाळेत पाठविण्यात आले. मंगळवारी पकडण्यात आलेल्या गुरांची मुद्देमालासह १७ लक्ष ५० हजार रुपये रक्कम काढण्यात आली आहे. (तालुका प्रतिनिधी)
तीन बैल पकडले
मंगळवारी ट्रकमध्ये ५०गुरांना पकडलने अवैध कत्तल करणाऱ्या तस्करांनी नवीन शक्कल लावली. बुधवारी मध्यप्रदेशच्या सावलमेंढा येथील बाजारातून तीन गुरे पुन्हा कत्तलीसाठी नेताना शिरजगाव पोलिसांनी पेट्रोलिंगदरम्यान बहीरम नाक्यावर पकडली. यातील आरोपींजवळ कुठल्याच प्रकारची पावती आढळून आली नाही. परिणामी चाळीस हजार रुपयांचे गुरे जप्त करून आरोपींना अटक करण्यात आली आहे.