शिरजगावात पाच अॅक्टिव्ह, एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:11 IST2021-04-12T04:11:36+5:302021-04-12T04:11:36+5:30
कोरोना चाचणीचे आवाहन : शिरजगाव कसबा : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत एप्रिल एका महिन्यात १३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची ...

शिरजगावात पाच अॅक्टिव्ह, एकाचा मृत्यू
कोरोना चाचणीचे आवाहन :
शिरजगाव कसबा : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत एप्रिल एका महिन्यात १३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली, थुगाव येथील ८० वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला. त्यापैकी सध्या पाच सक्रिय रुग्ण आहेत. त्यांच्या भागाला प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले. ताप, खोकला व अंगदुखी असणाऱ्या रुग्णांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
दरम्यान, शिरजगाव कसबा प्राथमिक आरोग्य केंद्र व बालमुकुंद राठी विद्यालय ठिकाणी कोरोना लसीकरण केंद्रात १४०० पेक्षा जास्त नागरिकांनी लस घेतली आहे. गावात कोरोनाचा उद्रेक होऊ नये म्हणून रविवारी सकाळी दहा ते सायंकाळी ६ पर्यंत लसीकरण केंद्र सुरू ठेवण्यात आले. मात्र, लस उपलब्ध नसल्यामुळे लसीकरण थांबले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी रोहित गणोरकर, डॉ. अपर्णा झोड व डॉ. वृंदा चित्रकार यांच्या मार्गदर्शनात आरोग्य सहायक मदन पुसदेकर, बाळकृष्ण तायडे, अशोक शिरभाते, नंदू धाकडे तसेच आरोग्य सेविका माधुरी बोरवार, नीलिमा रंगारी, सुवर्णा इंगळे, मालती पाटील हे लसीकरण करवून घेत आहेत.
दरम्यान, गावात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होऊ नये, यासाठी ग्रामस्वच्छता व कोरोना प्रतिबंधात्मक उपायांचे काटेकोर पालन करण्याचे नियोजन ग्रामपंचायत कार्यालयाने केले आहे, अशी माहिती ग्रामविकास अधिकारी राजू दाभाडे यांनी दिली. शिरजगावातील कोरोना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून काही भागांत ग्रामपंचायत कार्यालयाने बॅरिकेड लावून प्रतिबंधात्मक क्षेत्र घोषित केले आहे.