फिशरीज हब प्रकल्पाचे सादरीकरण
By Admin | Updated: July 24, 2016 00:13 IST2016-07-24T00:13:04+5:302016-07-24T00:13:04+5:30
महानगरपालिका व महाराष्ट्र मत्स्य उद्योग विकास महामंडळतर्फे शनिवारी फिशरीज हब या प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले.

फिशरीज हब प्रकल्पाचे सादरीकरण
मनपात कार्यशाळा : मत्स्य व्यावसायिकांची उपस्थिती
अमरावती : महानगरपालिका व महाराष्ट्र मत्स्य उद्योग विकास महामंडळतर्फे शनिवारी फिशरीज हब या प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. आ.सुनील देशमुख यांच्या उपस्थितीत महापालिकेच्या सभागृहात कार्यशाळा आयोजित केली होती.
फिश उत्पादनानंतर त्याला साठवण्यासाठी व निर्यातीसाठी या प्रकल्पाद्वारे व्यवस्था करण्यात येणार आहे. सद्यास्थितीत ४० टक्के मासोळी खराब होत आहे. हा प्रकल्प सुरु झाल्यावर मासोळी खराब होणार नाही. या प्रकल्पामुळे मात्स्य व्यवसायीकांना सर्व सुविधा मिळणार आहे. अमरावती शहराच्या बाहेर हा व्यवसाय पोहोचावा या उद्देशान प्रकल्प सुरु करण्यात आला आहे. अमरावती महानगरपालिका व महाराष्ट्र मत्स्य उद्योग विकास महामंडळ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने सदर प्रकल्प राबविण्यात येणार आहे. शुक्रवार मार्केट येथे फिश मार्केट तर बडनेरा येथे फिशरीज हब तयार करण्यात येणार असून हा प्रकल्पाची किंमत ही ४० कोटी राहणार आहे. येत्या अधिवेशनात या प्रकल्पासाठी २० कोटी ठेवण्यात आले आहे व केंद्र शासन विस कोटी देणार आहे.
या प्रकल्पात मत्स्य व्यवसायीकांचा सहभाग व्हावा या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आ.सुनिल देशमुख यांंनी कार्यशाळेदरम्यान दिली. यावेळी मत्स्य व्यवसायीकांचे प्रतिनिधी यांनी व्यवसायीकांना जी जागा देण्यात येणार आहे ती कमी असून ती वाढवण्यात यावी तसेच आमच्या सूचनाच्या विचार करावा अशी मागणी यावेळी केली. आ.सुनील देशमुख यांनी सदर सूचना विचारात घेवून प्रकल्प राबवावा असे निर्देश यावेळी दिल्या गेलेत. कार्यशाळेला महापौर चरणजिकौर नंदा, स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, मनपा आयुक्त हेमंत पवार, सभागृह नेता बबलू शेखावत, विरोधी पक्षनेता प्रवीण हरमकर, गटनेता चेतन पवार, संजय अग्रवाल, प्रकाश बनसोड, गुंफा मेश्राम, शिक्षणसमिती सभापती आरीफ हुसेने मुनाफ हुसेन, झोन सभापती अंजली पांडे, नगरसेवक विलास इंगोले, मिलिंद बांबल, सुनील काळे, दिनेश बुब, बाळासाहेब भुयार, कोमल बोथरा, नितीन देशमुख, नितीन देशमुख, चंदुमल बिल्दानी, दीपक पाटील, कुसुम साहू, मंजुषा जाधव, अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.