शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
3
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
4
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
5
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
6
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
7
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
8
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
9
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
11
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
12
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
13
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
14
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
15
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
16
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
17
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
18
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
19
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
20
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!

पाच वर्षात पहिल्यांदा रबीचे सरासरी क्षेत्र पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:08 IST

अमरावती : सुरुवातीला कमी पाऊस, वांझोटे सोयाबीन बियाणे व नंतर ऑगस्टपासून लागलेली पावसाची रिपरिप यामध्ये खरिपाच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात ...

अमरावती : सुरुवातीला कमी पाऊस, वांझोटे सोयाबीन बियाणे व नंतर ऑगस्टपासून लागलेली पावसाची रिपरिप यामध्ये खरिपाच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांची मदार रबीवर आहे. पाच वर्षांत पहिल्यांदा रबीचे सरासरी क्षेत्र पार झाले आहे. सद्यस्थितीत १ लाख ५९ हजार ९६८ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली. ही सरासरी क्षेत्राच्या तुलनेत १११ टक्के असल्याचे कृषी विभागाने सांगितले.

जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस सर्वच तालुक्यात झाल्याने जमिनीत आर्द्रता चांगली आहे. प्रकल्पातही संचयपातळी एवढा पाणीसाठा असल्याने रबीला पाण्याच्या पाळया मिळणार असल्यानेही दिलासा मिळाला आहे. तसेही खरिपातील सोयाबीन उद्ध्वस्त झाल्याने या क्षेत्रात शेतकऱ्यांनी हरभऱ्याची पेरणी केली. याशिवाय गुलाबी बोंडअळी व बोंडसडमुळे कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने अनेक भागात कपाशीमध्ये रोटाव्हेटर फिरविला जात आहे. या क्षेत्रातही गहू व हरभऱ्याची पेरणी होत असल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यात यंदा रबीसाठी १ लाख ४५ हजार १८१ हेक्टर सरासरी क्षेत्र प्रस्तावित असताना सद्यस्थितीत १ लाख ५९ हजार हजार ९६८ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. याव्यतिरिक्त आणखी गव्हाची पेरणी जानेवारी अखेरपर्यंत होणार असल्याचे कृषी विभागाने सांगितले. सद्यस्थितीत रबी ज्वारी ६४.८ हेक्टर, गहू ३६,८२९ हेक्टर, मका ८१९.९० हेक्टर, हरभरा १,१७,३६३ हेक्टर, करडई २ हेक्टर, जवस ८ हेक्टर क्षेत्रात पेरणी झालेली आहे.

बॉक्स

हरभऱ्याचे सर्वधिक क्षेत्र

यंदा हरभऱ्याचे उच्चांकी पेरणीक्षेत्र आहे. धारणी तालुक्यात १२,७५४ हेक्टर, चिखलदरा १७५० हेक्टर, अमरावती ६,४३१ हेक्टर, भातकुली ८१९९ हेक्टर, नांदगाव खंडेश्वर ७,९१० हेक्टर, चांदूर रेल्वे ४,५१५ हेक्टर, तिवसा ८,१६८ हेक्टर, मोर्शी ७,८४८ हेक्टर, वरूड ३,५९५ हेक्टर, दर्यापूर २१,५१६ हेक्टर, अंजनगाव सुर्जी ५६८० हेक्टर, अचलपूर ४,७३८ हेक्टर, चांदूर बाजार ११,०३६ हेक्टर व धामणगाव रेल्वे तालुक्यात १३,२२२ हेक्टरमध्ये हरभऱ्याची पेरणी झालेली आहे.