शहरात पहिले ‘स्किल डेव्हलपमेंट सेंटर’

By Admin | Updated: December 27, 2016 00:50 IST2016-12-27T00:50:54+5:302016-12-27T00:50:54+5:30

स्किल इंडिया मिशनअंतर्गत महाराष्ट्र शासन व सर दोराबजी टाटा ट्रस्ट यांच्या सहकार्याने राज्यातील

The first 'Skill Development Center' in the city | शहरात पहिले ‘स्किल डेव्हलपमेंट सेंटर’

शहरात पहिले ‘स्किल डेव्हलपमेंट सेंटर’

मुख्यमंत्र्याच्या हस्ते उदघाटन: जिल्हाधिकाऱ्यांची पत्रपरिषदेत माहिती
अमरावती : स्किल इंडिया मिशनअंतर्गत महाराष्ट्र शासन व सर दोराबजी टाटा ट्रस्ट यांच्या सहकार्याने राज्यातील पहिले करिअर डेव्हलपमेंट व कौन्सिलिंग सेंटर जिल्हाधिकारी कार्यालयात सुरु होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते २९ डिसेंबरला या केंद्राचे उद्घाटन होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी गित्ते यांनी सोमवारी पत्रपरिषदेत दिली.
३० जिल्ह्यात असे केंद्र सुरु करण्यात येणार आहेत. याची सुरूवात अमरावती येथून होत आहे. याकेंद्रातून वर्षभरात १० हजार युवकांना करिअर गाईडन्स व कौन्सिलिंग करण्यात येणार आहे. उद्योगांमध्ये व बाजारपेठेतील कुशल मनुष्यबळाची गरज लक्षात घेता, याकेंद्रामध्ये तरुणांना प्रशिक्षित केले जाईल. कौशल्यबळ विकासखाते याविषयी सातत्याने पाठपुरावा करणार आहे. प्रत्येक युवकााचा आधार क्रमांक ट्रेस करण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
जिल्ह्यासाठी फ्युएल सामाजिक संस्थेची याकेंद्रासाठी निवड करण्यात आली आहे. पत्रपरिषदेला फ्युएल संस्थेचे केतन देशपांडे, कौशल्य विकास विभागाचे उपसंचालक महेश देशपांडे, एमआयडीसीचे अध्यक्ष किरण पातुरकर उपस्थित होते.

संत्रा प्रकल्पही लागणार मार्गी
४मोर्शी तालुक्यातील हिवरखेड येथील संत्रा प्रक्रिया प्रकल्पाचे उद्घाटन देखील मुख्यमंत्र्याच्या हस्ते यादिवशी होण्याची शक्यता आहे. तसेच नियोजनभवनातील कार्यक्रमात श्री गणेशोत्सव मंडळ टोपेनगरद्वारा १३ शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी १५ हजारांची मदत देण्यात येत असल्याची माहिती किरण पातुरकर यांनी दिली.

Web Title: The first 'Skill Development Center' in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.