शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीत पहिले सिंधी महापौर; भाजपचे श्रीचंद तेजवानींना मिळाला मान, तर युवा स्वाभिमान पक्षाचे झाले उपमहापौर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 15:07 IST

Amravati : अमरावती महापालिकेत शुक्रवार, ६ फेब्रुवारी रोजी महायुतीची सत्ता स्थापन झाली. भाजपचे श्रीचंद तेजवानी महापौर तर आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाचे सचिन भेंडे हे उपमहापौरपदी निवडून आलेत.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अमरावती महापालिकेत शुक्रवार, ६ फेब्रुवारी रोजी महायुतीची सत्ता स्थापन झाली. भाजपचे श्रीचंद तेजवानी महापौर तर आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाचे सचिन भेंडे हे उपमहापौरपदी निवडून आलेत. एकूण ८७ पैकी ५५ मते महापौर, उपमहापौरांना मिळाली असून एमआयएमच्या बडनेरा येथील नगरसेविका मीरा कांबळे यांनी महायुतीच्या उमेदवारांना मतदान केल्यामुळे सर्वानाच आश्चर्याचा धक्का बसला, हे विशेष.

शुक्रवारी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या पिठासीनाखाली महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक हात उंचावून घेण्यात आली. अगोदर महापौर त्यानंतर उपमहापौरपदाची निवडणूक पार पडली. यात महापौर श्रीचंद तेजवानी आणि उपमहापौर सचिन भेंडे या दोघांनाही ५५ मते मिळाली. तर काँग्रेसचे महापौरपदाचे उमेदवार डॉ. संजय शिरभाते आणि उपमहापौर पदाच्या उमेदवार लुबना तनवीर यांना प्रत्येकी १६ मते प्राप्त झाली. काँग्रेसचे १५ तर उद्धवसेनेचे एक असे एकूण १६ मते काँग्रेसच्या उमेदवारांना मिळाली.

बसप महापौरपदाचे उमेदवार ईस्माईल लालूवाले आणि उपमहापौरपदाचे उमेदवार सचिन वैद्य यांना ३ मते प्राप्त झाली. तसेच महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीत एमआयएम ११, वंचित बहुजन आघाडी १ आणि उद्धवसेना १ असे एकूण १३ सदस्य तटस्थ राहिले. ही निवडणूक प्रक्रिया ईन कॅमेरा पार पडली. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी महापौर, उपमहापौरांना मिळालेली मते वाचून दाखवित विजयी उमेदवारांची नावे घोषित केली. त्यानंतर नवनियुक्त महापौर श्रीचंद तेजवानी, उपमहापौर सचिन भेंडे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून त्यांना आसनस्थ करण्यात आले. यावेळी आयुक्त सौम्या शर्मा चांडक, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त नरेंद्र वानखडे, योगेश पीठे यांनी महापौर, उपमहापौरांचे स्वागत केले.

असे होते ८७ पक्षीय बलाबल

अमरावती महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत ८७ सदस्य निवडून आले होते. यात भाजप २५, काँग्रेस १५, युवा स्वाभिमान पक्ष १५, एमआयएम १२, राष्ट्रवादी (अजित पवार) ११, शिंदेसेना ३, बसप ३, उद्धवसेना २ तर वंचित बहुजन आघाडी १ असे ८७ पक्षीय बलाबल होते.

"मला कोणाचाही पक्षादेश नव्हता. महापौर, उपमहापौरपदाचे उमेदवार चांगल्या प्रतिमेचे आणि सुरक्षित विचार वाटले म्हणून महायुतीला मतदान केले. कारवाईची भीती नाही. राजनीतीत सारेच चालते. मी स्वतःच निर्णय घेतला."- मीरा कांबळे, नगरसेविका एमआयएम, बडनेरा प्रभाग क्रमांक २१ 

English
हिंदी सारांश
Web Title : Amravati Gets First Sindhi Mayor; BJP's Tejwani Elected, Deputy From Yuva Swabhiman

Web Summary : In Amravati, BJP's Shrichand Tejwani became mayor, and Sachin Bhende, from Yuva Swabhiman, deputy mayor. They secured 55 votes out of 87. An MIM corporator surprisingly voted for the alliance. The election saw MIM, VBA, and Uddhav Sena members abstain.
टॅग्स :Amravati Municipal Corporation Electionअमरावती महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६AmravatiअमरावतीBJPभाजपाMayorमहापौर