पेरणीच्या पहिल्या टप्प्यात कपाशी वरचढ

By Admin | Updated: June 28, 2015 00:27 IST2015-06-28T00:27:23+5:302015-06-28T00:27:23+5:30

पावसाने दोन दिवस उसंत दिल्याने खरिपाच्या पेरणीला वेग आला आहे.

In the first phase of sowing, cotton is high | पेरणीच्या पहिल्या टप्प्यात कपाशी वरचढ

पेरणीच्या पहिल्या टप्प्यात कपाशी वरचढ

खरीप २०१५ : जिल्ह्यात १९ टक्के क्षेत्रात आटोपल्या पेरण्या
अमरावती : पावसाने दोन दिवस उसंत दिल्याने खरिपाच्या पेरणीला वेग आला आहे. जिल्ह्यात सध्या १९ टक्के क्षेत्रात पेरणी झाली आहे. यामध्ये सर्वाधिक ६२ हजार क्षेत्रात कपाशीची पेरणी आहे. सोयाबीनचे शुक्रवारपर्यंत ४६ हजार पेरणी क्षेत्र होते. जिल्ह्यात सर्वाधिक ५८ टक्के पेरण्या वरुड तालुक्यात आटोपल्या आहेत.
जिल्ह्यात २६ जूनपर्यंत १ लाख ३५ हजार हेक्टर क्षेत्रात पेरणी आटोपली आहे. यावर्षी पेरणीच्या पहिल्या टप्प्यात सोयाबीनऐवजी कपाशीला शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले आहे. १६ हजार ६६७ हेक्टर क्षेत्रात तूर, २ हजार ३४३ हेक्टरमध्ये धान, २ हजार ८६८ हेक्टरमध्ये ज्वारी, १ हजार ९१५ हेक्टरमध्ये मका, २ हजार ४६२ हेक्टरमध्ये मुग, ६३२ हेक्टरमध्ये उडीद, अशी पेरणी आटोपली आहे. पेरणी झालेल्या क्षेत्राची सरासरी १८ टक्के आहे. यामध्ये सर्वाधिक २७ हजार ६४८ हेक्टर क्षेत्रात वरुड तालुक्यात पेरणी झाली आहे. १६ हजार ९४० हेक्टर धामणगाव, २३ हजार ६२९ हेक्टर अचलपूर, १५ हजार २८८ हेक्टर धारणी, ६ हजार ५३८ नांदगाव, ४ हजार ८१२ हेक्टर अमरावती, २ हजार ८१५ हेक्टर भातकुली, ६ हजार ५३८ हेक्टर नांदगाव, २ हजार ६७ हेक्टर चांदूररेल्वे, ५ हजार ६९८ हेक्टर तिवसा, ४ हजार ७४० मोर्शी, ७ हजार ५५९ हेक्टर दर्यापूर, ३ हजार ८१४ हेक्टर अंजनगाव सुर्जी तालुक्यात पेरणी झाली आहे. मागील तीन दिवसांपासून उघाड असल्याने पेरणीला वेग आला.

अशी झाली
पेरणी (हेक्टर)
खरिपाचे सरासरी क्षेत्र - ७,१४,९५०
पेरणी झालेले क्षेत्र - १,३५,००४
एकूण तृणधान्य - ७,१२६
एकूण कडधान्य - १९,७६१
एकूण गळीत धान्य - ४६,०८१

Web Title: In the first phase of sowing, cotton is high

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.