येवद्यात जिल्ह्यातील पहिले शेततळे
By Admin | Updated: January 24, 2017 00:23 IST2017-01-24T00:23:09+5:302017-01-24T00:23:09+5:30
‘मागेल त्याला शेततळे’ योजनेंतर्गत येवदा गावातील शेतकरी बंडू चोरे यांच्या शेतात जिल्ह्यातील पहिले शेततळे तयार करण्यात आले.

येवद्यात जिल्ह्यातील पहिले शेततळे
प्रात्यक्षिक : कृषी आयुक्तांसह जिल्हाधिकाऱ्यांची उपस्थिती
येवदा : ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेंतर्गत येवदा गावातील शेतकरी बंडू चोरे यांच्या शेतात जिल्ह्यातील पहिले शेततळे तयार करण्यात आले. यानिमित्ताने या शेतकऱ्याचा गौरवदेखील करण्यात आला.
रविवारी या शेततळ्याचे प्रात्यक्षिक पाहण्याकरिता व परिसराचे सर्वेक्षण करण्याकरिता महाराष्ट्र राज्य कृषी आयुक्त विकास देशमुख, जिल्हाधिकारी किरण गित्ते, विभागीय कृषी संचालक सु.रा.सरदार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मुळे, दर्यापूरचे उपविभागीय अधिकारी राठोड, उपविभागीय कृषी अधिकारी कुलकर्णी, तालुका कृषी अधिकारी व्ही.डी.लंगोटे, कृषी अधिकारी जी.ओ. कळस्कर, तहसीलदार राहुल तायडे उपस्थित होते.
राजस्थानी ट्रॅक्टर्सच्या मदतीने खोदण्यात येणारे शेततळे नागरिकांना आकर्षित करीत आहेत. जेवढे पाणी ट्रेनने लातूर येथे नेले गेले तेवढेच पाणी या शेततळ्यात गोळा केले जाऊ शकते, अशा प्रतिक्रिया यावेळी उपस्थितांनी व्यक्त केल्यात. कृषी सहायकांच्या माध्यमातून गावातील शेततळे आॅनलाईन करण्याबाबत आढावा घेण्यात आला. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी व्ही.बी.भोई यांना या परिसरात अधिकाधिक शेततळे करण्याचे आव्हान सोपविण्यात आले.
राज्य शासनाने शेतकऱ्यांकरिता ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत दर्यापूर तालुक्यासाठी ३ हजार ४०० शेततळ्यांचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत प्रत्येक गावातील कृषी सहायकाने १०० शेततळे खोदावेत, असे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. (वार्ताहर)