आंदोलनाने गाजला आठवड्याचा पहिला दिवस

By Admin | Updated: October 6, 2015 00:31 IST2015-10-06T00:31:47+5:302015-10-06T00:31:47+5:30

आठवडयाच्या पहिल्याच दिवशी विविध सामाजिक संघटनासह नागरिक व राजकीय पक्षाच्या नेत्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले.

The first day of the week for Gazla | आंदोलनाने गाजला आठवड्याचा पहिला दिवस

आंदोलनाने गाजला आठवड्याचा पहिला दिवस

निवेदने, धरणे : जिल्हा कचेरीवर नागरिकांनी गर्दी
अमरावती : आठवडयाच्या पहिल्याच दिवशी विविध सामाजिक संघटनासह नागरिक व राजकीय पक्षाच्या नेत्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. यावेळी निवेदक, धरणे, आणि निदर्शकांनी गर्दी केल्याने या परीसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात सभागृहात लोकशाही दिवसाचे कामकाज सुरू असल्याने ही गर्दी खोळंबून राहीली.मात्र अशातच लोकशाही दिन संपताच जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी आंदोलन कर्त्याची निवेदने स्विकारलीत.
सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रहारची धडक
जिल्ह्यातील सोयाबीन ,संत्रा, कापुस व सर्व पिकांना दिवाळी पर्यत सरसकट प्रती हेक्टर ५० हजार रूपये नुकसान भरपाई देण्यात यावी, रखडलेले ठिंबक व स्पिंकलर पाईपचे अनुदान देण्यात यावे, हद्य विकाराच्या झटक्याने मरण पावणाऱ्या शेतकऱ्यांना नैसगीक आपत्तीमध्ये समाविष्ट करण्यात यावे आदी मागण्यासाठी प्रहार पक्षाचे वतीने सोमवारी जिल्हाकचेरीवर धडक दिली. यावेळी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी आंदोलन कर्त्याशी दालना बाहेर येऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या
दरम्यान जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी सोयाबीन , संत्रा फळाची प्रत्यक्ष आंदोलन क र्त्यासमोर पाहणी केली आणि याबाबत शासनाकडे योग्य तो पाठपुरावा करण्याचे आश्वासन देण्यात आले यावेळी मंगेश देशमुख, राजेश वाटाणे, भाष्कर सायंदे, अजय तायडे, सागर धनसांडे, मंगेश शळके, सुरज चव्हाण, संजय राऊत , अविनाश बायस्कर व पदाधिकारी उपस्थित होते.
शासकीय योजनाची अंमलबजावणी शेतकऱ्यांपर्यत करा
शेतकऱ्याच्या विकासासाठी राज्य व केंद्र शासनाच्या विकास योजना शेतकऱ्यांन पर्यत पोहचविण्यासाठी शेतकरी मित्राना माहीती देण्यात यावी यासह इतर मागण्याचे निवेदन सोमवारी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्याक डे निवेदनाव्दारे केली आहे.
शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनातील प्रमुख मागण्यामध्ये शेतकरी मित्रांना कामाचा मोबदला म्हणून रोख रक्कम देण्यात यावी, किड सर्वेक्षक , किड नियंत्रक म्हणून अनुभवी शेतकरी मित्रांची निवड करण्यात यावी, अशा विविध मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. यावेळी अर्चना सवाई, प्रमोद बांबल, श्यामकांत सनके, पुडंलीक खोबरखेडे, विनोद धंदर, चरणदास ठाकरे, पुरूषोत्तम कथे, निलेश बोबडे मनोज खटे, आदी उपस्थित होते.
महागाई विरोधात भाकपचे जिल्हाकचेरीवर निदशर््ने
केंद्रात दिड वर्षापूर्वी सत्तेत आलेल्या भाजपा सरकारने महागाई वर नियंत्रण आण्यापेक्षा महागाई वालविण्याचा उच्चांक गाठला आहे.त्यामुळे वाढलेल्या जिवनावश्यक वस्तुचे भाव कमी करण्यात यावे यासाठी सोमवारी भारतीय कम्युनिष्ठ पक्षाचे वतीने जिल्हाकचेरी समोर निदर्शने केली. यावेळी मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.सन २०१४ च्या तुलनेत महागाई मध्ये १२ टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे केंद्र शासनाने सर्व प्रकारच्या डाळी, खाण्याचे तेल, साखर, औषधे, कापड अशा वस्तुचे वाढलेले दर कमी करण्यात यावे अशी मागणी भाकपने निवेदनाव्दारे केली आही. यावेळी तुकाराम भस्मे, शरद सुरजुसे, जे.एम कोठारी , उमेश बनसोड, अशोक सोनारकर, सुनिल मेटकर, सुनिल घटाळे, गणेश अवझाडे, उषा घटाळे, इंदु बोकेशरद मंगळे बी.के जाधव आणि पदाधिकारी उपस्थित होते.
शासकीय जागेवरील भूखंड कायम करा
तिवसा तालुक्यातील गुरूदेव नगर येथील हनुमान नगर येथील शासकीय जागेवर राहत असलेल्या नागरिकांचे घरांचे बांधकाम आणि शासकीय भूखंड कायम क रण्यात यावे अशी मागणी सोमवारी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्याकडे निवेदनाव्दारे शेकडो नागरिकांनी केली आहे.

Web Title: The first day of the week for Gazla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.