अमिषा जिल्ह्यात प्रथम
By Admin | Updated: June 4, 2017 00:03 IST2017-06-04T00:03:40+5:302017-06-04T00:03:40+5:30
सेंट्रल बोर्ड आॅफ सेकंडरी एज्युकेशन (सीबीएसई) बोर्डाद्वारे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल शनिवारी आॅनलाईन जाहीर झाला.

अमिषा जिल्ह्यात प्रथम
सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर
सात शाळांचा निकाल १०० टक्के
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : सेंट्रल बोर्ड आॅफ सेकंडरी एज्युकेशन (सीबीएसई) बोर्डाद्वारे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल शनिवारी आॅनलाईन जाहीर झाला. अमरावती जिल्ह्यातून स्कूल आॅफ स्कॉलरची विद्यार्थिनी अमिषा अंचित्तलवार हिने ९८.२० टक्के गुण मिळवित प्रथम स्थान मिळविले. याच शाळेचा भूषण मलानी याने ९८ टक्क्यांसह दुसरे, तर वेदांत चांडक या शाळेचा वेदांत चांडक याने ९७.२० टक्के गुण घेत तिसरे स्थान मिळविले.
सीबीएसईचा ओव्हरआॅल रिझल्ट घसरला असला तरी गत वर्षीच्या तुलनेत यावर्षीचा निकाल सरस ठरला आहे. विद्यार्थ्यांना निकालानंतर काही दिवसांतच विद्यार्थ्यांना त्याच्या गुणपत्रिका मिळणार आहेत.
जिल्ह्यात सीबीएसई बोर्डाशी संलग्नित असलेल्या १२ शाळा असून शहरात ११, तर वरूडमध्ये एक शाळा आहे. यापैकी शहरातील पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, स्कूल आॅफ स्कॉलर, महर्षी पब्लिक स्कूल, पी.आर.पोटे पाटील इंटरनॅशनल स्कूल, इंडो पब्लिक स्कूल, अभ्यासा इंग्लिश स्कूल व वरूड येथील आॅरेंज सिटी इंग्लिश स्कूलचा निकाल १०० टक्के लागला. यामुळे शाळांत उत्साहाचे वातावरण होते.